किसन फागुजी बनसोड
किसन फागुजी बनसोडे (बंदसोडे) (१८७९ - १९४६) हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित नेते होते. ते नागपूर जिल्ह्यात राहत होते. त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध असतानाही त्यांनी त्या नाकारून आपल्या कार्यातून दलितांच्या वेदना मांडल्या."सन्मार्ग बोधक निराश्रीत समाज"(1903) या समाजाची स्थापना केली.अस्पृश्यांची शैक्षणिक व आर्थिक प्रगती व्हावी प्रगती व्हावी आणि त्यांना मानवी हक्क मिळावा हा त्यामागील उद्देश होता .
चोखामेळा सुधारणा मंडळ: किसन बनसोडे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने चोखामेळा सुधारणा मंडळाची व वाचनालयाची स्थापना केली.
चोखामेळा मुलींची शाळा (1907):किसन बनसोडे यांनी 1907 साली चोखामेळा मुलींची शाळा काढली. सामाजिक व आर्थिक जागृती बरोबरच त्यांनी शैक्षणिक विकासाचे ही कार्य केले.
१९०९ साली बनसोडे यांनी "मुंबई वैभव"मधून आम्हाला स्वातंत्र्याचे व मानवतेचे हक्क दिले नाहीत तर ते आमच्या सामर्थ्याने आम्हाला घ्यावे लागतील असे लिहिले.
संदर्भ
[संपादन]- क्षीरसागर, रामचंद्र. Dalit Movement in India and Its Leaders, 1857-1956. 2010-10-16 रोजी पाहिले.