किर्लोस्कर उद्योग समूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
किर्लोस्कर उद्योग समूह
ब्रीदवाक्य "जीवनमान उंचावणे" (मूळ इंग्लिश भाषा: Enriching Lives
प्रकार प्रायव्हेट
स्थापना १८८८ (किर्लोस्कर ब्रदर्स लि. नावाने)
मुख्यालय पुणे, महाराष्ट्र, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती संजय किर्लोस्कर
उत्पादने पंप, इ.
महसूली उत्पन्न $२.७० बिलियन USD (२००५)
कर्मचारी ~२०,०००
संकेतस्थळ http://www.kirloskar.com/ www.kirloskar.com


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ रोजी गुर्लहोसूर या गावी झाला.धारवाड आणि कलादगी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी मंुबईच्या जे. जे. स्कूल ऑफ र्आट मधून चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिटयूटमध्ये कला शिक्षक आणि बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १८९७ मध्ये मुंबई सोडून ते बेळगावला आले. इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकलदुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. १९१० साली औंध संस्थानाकडून उत्पादनासाठी सवलती मिळाल्यामुळे कुंडल येथे निर्जन आणि निर्जल अशा माळरानावर किर्लोस्कर ब्रदर्स या नावाने लक्ष्मणरावांनी कारखाना उभारला आणि किर्लोस्कर वाडीच्या वसाहती प्रारंभ केला. शेतीसाठी लागणारे लोखंडी नांगर, मोटार, रहाट, चरक इत्यादी वस्तूंचे उत्पादन त्या कारखान्यात सुरु झाले. १९२० सालापासून भांडवल वाढविण्यासाठी कारखान्याचे त्यांनी मर्यादित कंपनीत रुपांतर केले. या कंपनीतर्फे आणखी विविध प्रकारचे उत्पादन होऊ लागले. त्यात हातपंप, लहान मोठे यांत्रिक पंप, लेथ मशीन्स तसेच लोखंडी फर्निचर इत्यादी. लक्ष्मणराव हे काही वर्षे औंध संस्थानाचे दिवाण होते. लक्ष्मणरावांनी औद्योगिक कारखाना चालविण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसतांनाही किर्लोस्कर उद्योग समूह त्यांन अतिशय परीश्रमाने उभा केला. अशा किर्लोस्करांवर २० जुन १९८९ साली भारत सरकार ने पोस्टाचे तिकीट हि काढले.