किम जाँग-इल
किम जॉंग-इल | |
उत्तर कोरियाचा सर्वोच्च पुढारी
| |
कार्यकाळ ८ जुलै १९९४ – १७ डिसेंबर २०११ | |
मागील | किम इल-सुंग |
---|---|
पुढील | किम जॉंग-उन |
जन्म | १६ फेब्रुवारी, १९४१ व्यात्स्कोय, खबारोव्स्क क्राय, सोव्हिएत संघ (सोव्हिएत नोंदीनुसार) १६ फेब्रुवारी, १९४२ बैकदू पर्वत, जपानी कोरिया (उत्तर कोरियन नोंदीनुसार) |
राजकीय पक्ष | कोरियन कामगार पक्ष |
धर्म | नास्तिक |
सही |
किम जॉंग-इल (कोरियन: 김정일; १६ फेब्रुवारी १९४१/४२ - १७ डिसेंबर २०११) हा उत्तर कोरिया देशाचा सर्वोच्च नेता, कामगार पक्षाचा सरचिटणीस, राष्ट्रीय संरक्षण खात्याचा प्रमुख व उत्तर कोरियन लष्कराचा प्रमुख होता. १९९४ साली वडील किम इल-सुंग ह्यांच्या मृत्यूनंतर किम जॉंग-इलच्या हाती उत्तर कोरियाची सत्ता आली.
१७ डिसेंबर २०११ रोजीकिम जॉंग-इलचे हृदयाघात होउन निधन झाले. त्याच्या पश्चात मुलगा किम जॉंग-उन ह्याला त्याने वारस नेमले आहे.
स्वतःला देवाचा अवतार समजणाऱ्या किम जॉंग-इलच्या विक्षिप्त स्वभाव व अविवेकी धोरणांमुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली. त्याच्या अणवस्त्रे मिळवण्याच्या धडपडीमुळे व इतर गोपनीयता राखण्याच्या निर्णयांमुळे चीन व काही अंशी रशिया वगळता सर्व जगाने उत्तर कोरियावर बहिष्कार टाकला होता. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा लष्करावर खर्च करण्याच्या त्याच्या धोरणामुळे उत्तर कोरियामधील बहुतेक सर्व उद्योग बंद पडले.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- किम जॉंग-इल व्यक्तिचित्रPDF (893 KB)
- किम जॉंग-इलचे बालपण Archived 2005-03-08 at the Wayback Machine.
- किम जॉंग-इल कुटुंबाची काही रहस्ये Archived 2005-02-13 at the Wayback Machine.