Jump to content

का.र. मित्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर) ( २ नोव्हेंबर, १८७१ - इ.स. १९२०) हे एक मराठी लेखक, मनोरंजन मासिकाचे आणि मनोरंजन या मराठी भाषेतील पहिल्या दिवाळी अंकाचे संपादक, तसेच बंगाली साहित्याचे मराठी अनुवादक होते.

कौटुंबिक माहिती[संपादन]

  • भाऊ : दामोदर रघुनाथ मित्र (हे पुस्तक-प्रकाशक होते. मनोरंजक ग्रंथ प्रसारक मंडळी ही यांची प्रकाशक संस्था. इ.स. १९२९ साली या संस्थेने मनोरंजन मासिकांतील निवडक लेखांचा एक भला मोठा संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित केला).
  • पत्‍नी : रमा
  • मुलगा (१) : रघुनाथ ऊर्फ रामू
  • कन्या (७) : शांता हिंगे, शिरीन शेठ, मालती, कुमुदिनी, इंदुमती, भानुमती आणि विमल