काही खरं काही खोटं (कथासंग्रह)
Appearance
काही खरं काही खोटं | |
लेखक | व. पु. काळे |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कथासंग्रह |
प्रकाशन संस्था | मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे |
प्रथमावृत्ती | १९८४ |
चालू आवृत्ती | जानेवारी २००८ |
मुखपृष्ठकार | सुभाष अवचट |
विषय | कथासंग्रह |
पृष्ठसंख्या | २०२ |
आय.एस.बी.एन. | ८१-७७६६-५५३-७ |
‘कथा वपुंची-तुमची आमची सगळ्यांची-जीवनाचे पुस्तक उघडल्याची.’ असे ह्या कथासंग्रहाबद्दल म्हणले गेले आहे ते खरे आहे. ह्या संग्रहातील ‘जे.के.’, ‘भदे, यांसारख्या वपुंच्या गाजलेल्या कथा याची साक्ष आहे. ही व्यक्तिमत्त्वे आपल्यासारखेच दैनंदिन जीवन जगत असतात तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात फरक असतो. ह्या फरकामुळे हे जीवन अधिकच जिवंत झालेले असते. वपु नेमके तेच हेरतात आणि ते इतक्या सहज शैलीत वाचकांना विश्वासात घेत वाचकांपुढे ठेवतात की त्यांनाही वाटते, जगावे तर हे असे. वपुंच्या सर्व ज्ञात वैशिष्ट्यांबरोबरच जीवन चेतना देणे हेही त्यांचे एक वैशिष्ट्य!
या संग्रहातील कथा
- जे.के.
- भदे
- हे असंच चालायचं
- दे हाता
- टक्कल पे शक्कल
- हसतंय कोण?
- तारतम्य
- एक हातसे ताली बजाव
- एनारडी
- अचपुकबाश्री बुंजिक मोघी
- मधला
- शब्द
- चक्रव्यूह
- सुपारी बिब्ब्याची