काळा किल्ला
Appearance
काळा किल्ला हा मुंबईतील शीवमधील धारावी येथील खाडीलगतचा किल्ला आहे. सध्या किल्ला हा खाडीलगत नसून झोपडपट्टी भागात आहे. सदर किल्ल्याचे बांधकाम सन १७३७ मध्ये तत्कालीन गवर्नर ऑफ बॉम्बे यांच्या आदेशाने झाले आहे. याबाबतचा शिलालेख किल्ल्याच्या तटबंदीला एका बाजूला आहे.
सध्या ह्या किल्ल्याची स्थिती फारशी बरी नाही. ह्या किल्ल्याच्या आजूबाजूला झोपड्यांनी वेढा दिला आहे. तसेच, सदर किल्ल्यावर व तटबंदीला लागून कोंबड्यांची खुराडी बांधून कुक्कुटपालन केले जात आहे.
सदर किल्ल्याला प्रवेशद्वार नाही. किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला लागून असलेल्या एका इमारतीच्या आवारातून शिडीची सोय केली आहे.
छायाचित्रे
[संपादन]
|