कारीमाता सामुद्रधुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कारीमाता सामुद्रधुनी, कारिमाता सामुद्रधुनी, कॅरिमाटा सामुद्रधुनी, [१] कॅरामाटा सामुद्रधुनी [२] तथा सेलात कारीमाता (इंडोनेशियन: Selat Karimata ) ही जावा समुद्र आणि दक्षिण चिनी समुद्रांना जोडणारी सामुद्रधुनी आहे. या दोन समुद्रांधील ती सामुद्रधुन्यांपैकी सगळ्यात रुंद असून उथळ आहे. याच्या पश्चिमेला इंडोनेशियाचा बेलितुंग द्वीपसमूह आणि पूर्वेला बोर्निओ (कालीमंतन) आहेत. ही सामुद्रधुनी रुंद असली तरीही त्यातील असंख्य बेटे प्रवाळी खडकांमुळ यातून वाहतूक करणे अवघड आहे.

रॉयल नेव्हीने डच ईस्ट इंडीजमध्ये केलेल्या १८११ च्या जावावरील आक्रमणासाठी या सामुद्रधुनीचा वापर केला होता. २०१४मध्ये इंडोनेशिया एरएशिया फ्लाइट ८५०१ येथे कोसळली होती..

प्रवाह आणि जलवाहतूक[संपादन]

सामुद्रधुनीमधून वाहणाऱ्या पाण्याची दिशा, वेग आणि प्रमाण मान्सूनच्या वाऱ्यावर अवलंबून असते. याचा वेग भरमान्सूनमध्ये ताशी ६ किमी (३ समुद्रीमैल) इतका होऊ शकतो आणि मान्सून रोडावलेला असताना प्रवाह जवळजवळ थांबलेला असतो. अशा वेळी प्रवाहाची दिशा भरतीच्या प्रवाहाच्या अधीन असू शकते. [१]

ही सामुद्रधुनी उथळ (५० मी किंवा कमी खोलीची) असल्याने यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोठे नाही.[३][३] इंडोनेशियन आणि चिनी संशोधकांनी केलेल्या २००७-८ च्या अभ्यासात असे आढळून आले की निव्वळ दक्षिणेकडे (म्हणजे जावा समुद्रापर्यंत) वाहतुकीचे प्रमाण सरासरी ५,००,००० मी 3 /सेकंद (किंवा ०.५ Sv) आहे. [४] हिवाळ्यात वायव्य मान्सून वाहत असताना या सामुद्रधुनीतील पाणी सरासरी २.७ Sv ने दक्षिणेकडे वाहते [४] तर नैऋत्य पावसाळ्यात हा प्रवाह १.२ Sv घनतेने उलट्या दिशेला वाहतो. [४]

युनायटेड स्टेट्स हायड्रोग्राफिक ऑफिसने प्रकाशित केलेला सामुद्रधुनीचा १९१७ मधील समुद्री नकाशा नॉटिकल चार्ट.

संदर्भ[संपादन]