काडेचिराईत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
किराईत

किराईत (किंवा चिराईत) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

किराईत

या वनस्पतीस लॅटिनमध्यें स्वर्टीया चेराइटा (swertia chirayita); संस्कृतमध्यें किरात, भूर्निब, किराततिक्त; मराठींत काडेचिराईत, किराईत; हिंदींत व गुजराथींत चिरायता इत्यादि नांवें आहेत. (काडेचिराईत हिं. चिरायत, चिरेता; क. नेलबेवू; गु. करियातू; सं. चिरतित्क, भूनिंब; इं. चिरेता; लॅ. स्वर्शिया चिराता; कुल- Gentianaceae (जेन्शिएनेसी).

यांत दोन जाती आहेत. एक काडेकिराईत व दुसरी पालेकिराईत. किराइताचीं झाडें लहान हात दीड हात उंच असून पानें लहान व लांबट असतात. पालेकिराईत हिंदुस्थानांत बागांतून होते. काडेचिराईत नेपाळकडून कलकत्त्याच्या मार्गानें मुंबईस येते. याची चव फार कडू असते.

ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) औषधी सु १.५ मी. उंच असून समशीतोष्ण हिमालयात १,२००-३,००० मी. उंचीवर, काश्मीर ते आसामपर्यंत आढळते.

पाने समोरासमोर, साधी, बिनदेठाची, खालची अधिक मोठी व कधी देठाची; परिमंजरी मोठी, शाखित व पर्णयुक्त; फुले लहान, फिकट हिरवी व त्यांवर जांभळी छटा; प्रत्येक पाकळीच्या तळाशी हिरवट प्रपिंडांची (ग्रंथींची) जोडी आणि तीवर पांढरे किंवा लालसर लांब केस. केसरदले ४-६, पाकळयांच्या तळाशी चिकटलेले; किंजपुटात एकच कप्पा [à फूल, ] बोंड लहान, ०.६ मिमी., लंबगोल आणि टोकदार असून फुटून त्याची दोन शकले होतात.बिया अनेक व सूक्ष्म असतात.

उपयोग - याचीं वाळलेलीं पानें, फुलें, मळें व काष्ठें यांच्या अंगीं पौष्टिक, ज्वरनाशक व सारक धर्म आहेत. बोंडें चांगलीं झाल्यावर झाडें मुळासकट काढून विक्रीकरितां पाठवितात. नेपाळांतून या झाडांचे गठ्ठे कलकत्यास जाऊन तेथून सर्व हिंदुस्थानस्थानभर व जगाच्या कित्येक भागांत त्यांची रवानगी होते.

आमवात, जीर्णज्वर व सर्व प्रकारच्या ज्वरांवर किराईत, सुंठ व डिकेमाली यांचा अष्टमांश काढा करून ठेवावा व सकाळीं तिसर्‍या प्रहरीं व सायंकाळीं याप्रमाणें तो तीन वेळ घ्यावा. आम्लपित्तावर किराईत व माका यांचा काढा करून त्यांत मध घालून द्यावा. हरताळाच्या विषावर किराइताचा काढा द्यावा.

फुले आली असताना ही वनस्पती जमा करून वाळवितात व औषधात वापरतात. ती कडू, दीपक (भूक वाढविणारी), ज्वरनाशक, सारक, पौष्टिक व कृमिनाशक आहे. अतिसार, दुर्बलता, ताप इत्यादींवर ती देतात. जीर्ण विषमज्वरात व आमाशयाच्या शिथिलतेत किराईत उपयुक्त असते. किराइताच्या वंशातील अनेक जाती डोंगराळ भागात आढळतात; त्यांचा उपयोग किराइताप्रमाणे करतात. भारतात दरवर्षी सु. ४०० क्विंटल किराइताचा वापर करतात.