Jump to content

काँक्रिट पंप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उंच ठिकाणी होणाऱ्या बांधकामासाठी पाईपलाईनद्वारे सिमेंट कॉंक्रिट पुरविणाऱ्या यंत्रास काँक्रिट पंप किंवा 'कॉंक्रिट बुम प्लेसर' असे म्हणतात. यास आखुड किंवा लांब करता येण्याजोगा एक हात असतो.त्याचे योगाने कॉंक्रिट सुमारे २० मीटर उंचीपर्यंत टाकता येऊ शकते.त्याचे शेवटचे टोकास मोडता/वळविता येण्याजोगा रबरी किंवा पॉलीप्रोपेलीनचा पाईप असतो. त्याने कॉंक्रिट नेमके ठिकाणी टाकता येते.

हे यंत्र एका ट्रकवर बसविलेले असते.त्या ट्रकमध्ये 'कोंक्रिट बॅचिंग प्लॅंट' मधुन 'मिलर' द्वारे सिमेंट कॉंक्रिट वाहुन आणुन ते त्याच्या हॉपरमध्ये टाकण्यात येते.तेथुन ते आवश्यक ठिकाणी पंप केल्या जाते.बुम प्लेसरचे वाहन व प्रत्यक्षात बुमचे शेवटचे टोक यात बरेच अंतर असल्यामुळे यंत्रचालक व शेवटच्या टोकादरम्यान संवाद साधण्यासाठी बिनतारी यंत्राची सोय असते.त्याजोगे यंत्रचालकास हवे ते आदेश देता येउ शकतात. यंत्राचा हात बराच उंच जात असल्यामुळे, संतुलन साधण्यासाठी वाहनास चार आधार देण्याची सोय असते.काम झाल्यावर हे आधार काढुन टाकण्यात येतात.त्यामुळे,ते वाहन आवश्यक असलेल्या दुसऱ्या ठिकाणी नेणे सोईचे होते.यंत्राचा हात लांब करणे, हवा तितका व हव्या त्या दिशेस मोडणे,त्याचे अंतर कमी जास्त करणे, हाताची घडी करणे ही सर्व कामे त्यात उभारलेली 'हायड्रॉलिक्स प्रणाली' वापरून सोईस्कररित्या करण्यात येतात.