कवड्या साप हा एक बिनविषारी साप आहे. हा पाली-सरडे झुरळ खाण्यासाठी मानवी वस्ती जवळ येतो. साप रंगाने गडद तांबडा असतो. त्यावर पांढऱ्या रंगाच्या आडव्या पट्ट्या असतात त्यामुळे कवड्याची माळ घातल्याप्रमाणे भासते. हा साप बऱ्याचदा दिसतो. दिसायला मण्यार सारखा असल्यामुळे पाहताक्षणी लोक गोंधळात पडतात. इंग्रजी मध्ये या सापास कॉमन वूल्फ स्नेक असे म्हणतात.आणि हा साप भिंतीवरही सहज चढू शकतो हा साप पालीला आकर्शित करण्यासाठी त्याची शेपटी हलवतो जनु एखादा किटक आहे पाल जेव्हा त्याला खाण्यासाठी येते तेव्हा तो पालीला आपले भक्ष बनवतो