कलिनन हिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कलिनन हिरा हा आजतगायत सापडलेला सगळ्यात मोठा नैसर्गिक हिरा आहे. सापडला तेव्हा याचे वजन ३,१०६.७५ कॅरेट (६२१.३५ ग्रॅम) होते. हा हिरा दक्षिण आफ्रिकेतील कलिनन या गावातील प्रीमियर नंबर २ या खाणीत २६ जानेवारी, १९०५ रोजी सापडला. याला खाणीचे मालक थॉमस कलिननचे नाव देण्यात आले.

कलिनन हिरा युनायटेड किंग्डमचा राजा सहाव्या एडवर्डला त्याच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आला. त्यानंतर त्याचे अनेक तुकडे करण्यात आले. त्यांपैकी कलिनन १ तथा ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका हा ५३०.४ कॅरेटचा (१०६.०८ ग्रॅम) हिरा सगळ्यात मोठा आहे. हा सध्याचा जगातील सगळ्यात मोठा पारदर्शक हिरा आहे. व १९८५मध्ये सापडलेल्या ५४५.६७ कॅरेटच्या (१०९.१३ ग्रॅम) गोल्डन ज्युबिली या पिवळसर हिऱ्यापेक्षा थोडसाच छोटा आहे. कलिनन १ हिरा युनायटेड किंग्डमच्या राजदंडात जडलेला आहे. कलिनन २ तथा सेकंड स्टार ऑफ आफ्रिका हा ३१७.४ कॅरेटचा (६३.४८ ग्रॅम) हिरा यु.के.च्या राजमुकुटात जडलेला आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]