कर्दळीवन : एक अनुभूती (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

’कर्दळीवन : एक अनुभूती’ हे दत्तभक्त प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे.

दत्तात्रेयांचे गुप्त स्थान आणि स्वामी समर्थाचे प्रकट स्थान म्हणून कर्दळीवनाचे नाव अनेक भाविकांना माहीत असले तरी कर्दळीवनाचे नेमके भौगोलिक स्थान, तेथील वातावरण, सद्यस्थिती, परिक्रमा मार्गाची माहिती या गोष्टी तशा अज्ञात होत्या. ती उणीव या पुस्तकाने भरून काढली आहे. कर्दळीवन आणि दत्तात्रेयांचे तीन अवतार, इतिहास, भौगोलिक स्थान आणि परिसर, परिक्रमेचा इतिहास, पंचपरिक्रमेची माहिती, माहात्म्य आणि महत्त्व, समज, अपसमज आणि श्रद्धा, अन्नदान, अतिथिसेवा, अशा कर्दळीवनासंदर्भातील अनेक घटकांची विस्तृत माहिती या पुस्तकातून मिळते.

क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेली अन्य पुस्तके[संपादन]

  • उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा
  • दत्तपरिक्रमा