करोता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करोता

Snake Bird
Darter (Snake Bird) DSC 0661

करोताला इंग्रजी मध्ये -darter or snake -bird म्हणतात . करोता पक्षाला मराठी मध्ये मोठा पान कावळा , कार बगळा ,ढोक लांबडा ढोक म्हणतात .

ओळखण[संपादन]

हा पक्षी आकाराने मोठ्या बदकाएवढा असतो . पानकावळ्या सारखा दिसणारा हा पाणपक्षी त्याच्या पाठीवर रुपेरी रंगाच्या रेषा असतात . त्याच्या डोके व मानेचा रंग मखमली बदामी असतो .तसेच हनुवटी व गळा पंदुरका आणि लांब तहाठ शेपटी असते .पोहोताना त्याची मान पाण्याबाहेर नागासारखी वळवळताना दिसते .त्याचे डोके अरुंद आणि खंजीरा सारखी चोच असते .नर आणि मादी दिसायला सारखेच असतात .

वितरण[संपादन]

स्थानिक स्थलांतर भारत बंगला देश आणि पाकिस्तान उत्तर भारतात जून मध्ये तर दक्षिण भारतात नोहेंबर ते फेब्रुवारी या काळात वीण करतात

निवासस्थाने[संपादन]

दलदली आणि सरोवरे

संदर्भ[संपादन]

पक्षिकोश

लेखकाचे नाव - मारुती चितमपल्ली