कराडी समाज
Appearance
कराडी समाज मुळातच लढवय्या समाज,यांचा वेष साधारण तहा मराठ्यांसारखा असतो,हे विषेशत:उरण ,पनवेल आणि मुरुड तालुक्यात स्थानिक भुमिपुत्र आहेत.
यांच्या विवाहाप्रसंगी आगरी कोळ्यांसारखी धवले गाण्याची पद्धत आहे व हळदी मध्ये गोड वड्या करण्याची पद्धत आहे ज्याचा आकार दक्षिण भारतीय "मेंदुवड्या' सारखा असतो.
ह्या समाजाने
शिकारी मध्ये ही प्रभुत्व गाजविले आहे,प्रसंगी शेतामध्ये आणि समाजाच्या वस्ती
उपद्रव करणाऱ्या जंगली जनावरांचा ते चोख बंदोबस्त करतात.परंतु कायदे मोडत नाहित,पूर्वी जेंव्हा मराठा साम्राज्य होते तेन्व्हा ह्या समाजातील लोक सैन्यात होते.
उरण तालुक्यातील पानदिवे आणि भंगारपाडा (सारडे ग्रामपंचायत) मोठीजुई येथे त्यांची वस्ती आहे.
यांचे आगरी समाजाशी चांगले संबंध आहेत.