कन्टेन्ट क्रिएशन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखादया विषयासंदर्भात माहिती / मजकूर माध्यमांद्वारे विशेषतः डिजिटल माध्यमाद्वारे माहितीची आवश्यकता असलेल्या व्यक्तीपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पाहोचविण्यामध्ये कन्टेन्ट क्रिएशन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.[१] एखादया माध्यमाद्वारे जसे भाषण, अभिव्यक्ती, लेखन किंवा इतर कला या द्वारे स्वतःला व्यक्त करताना, जाहिरात करताना, मार्केटिंग किंवा प्रसिद्धी करताना तयार होणा-या शब्दसंपत्तीस मजकूर (कन्टेन्ट ) असे म्हटले जाते.[२]. वेबसाईटची देखभाल करणे आणि वेबसाईट अदययावत करणे, ब्लॉगिंक, छायाचित्रण, चित्रीकरण, ऑनलाईन कॉंमेन्ट्री, सोशल मिडीआ अकांऊटची देखभाल करणे, डिजिटल माध्यमामध्ये येणा-या अडचणी दूर करणे किंवा त्यात काही बदल करणे या सर्व बाबी कन्टेन्ट क्रिएशन्समध्ये समाविष्ट आहेत. प्यू अहवालानुसार कन्टेन्ट क्रिएशन्स म्हणजे ‘ऑनलाईन जगतामध्ये लोकांचा सहभाग वाढविणे ’.[३]

मजकूरांचा निर्माता[संपादन]

बातम्या देणाऱ्या संस्था[संपादन]

द न्यू यॉर्क टाईम्स, एनपीआर आणि सीएनएन यासारख्या नामांकित आणि आंतरराष्ट्रीय बातम्या देणा-या संस्थेने वेबपेजवरून प्रसारीत केलेल्या सनसनाटी बातम्यांना खूप मोठा प्रेक्षकवर्ग मिळतो. ऑक्सफर्ड स्कूल फोर द स्टडी ऑफ जर्नलिझम आणि रूटर्स इनिस्टीटयूट फोर द स्टडी जर्नलिझम, यूकेमध्ये सोशल मिडीआ २०११ च्या अहवालानुसार ‘युकेमध्ये सामाजिक जीवनामध्ये प्रसार माध्यम हे जीवनदायीनी ठरू लागले आहे’.[४] डीजिटल माध्यमाच्या उगमानंतर पारंपारिक बातम्यांच्या माध्यमावर अवकळा आलेली आहे. सदयस्थितीत प्रत्येक मजकूर वेबवर पाठविण्यात येतो आणि सोशल मिडीआ वापरकर्त्यांकडून तो प्रसारीत केला जातो. ट्विटर ही सनसनाटी बातम्या प्रसारीत करणारी महत्त्वपूर्ण सोशल मिडीआ वेबसाईट आहे. ट्विटरवरील बातम्यांचे प्रसारीकरण हा जागतिक पत्रकारीतेमध्ये चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे.[५]

महाविदयालये, विदयापीठे, आणि वैचारिक साहित्य[संपादन]

महाविदयालये, विदयापीठे यासारख्या शैक्षणिक संस्था यांचेकडून प्रकाशित होणारी पुस्तके, लेख मालिका, शुभ्र पुस्तिका , ऑनलाईन कोर्स, डीजिटल स्कॉलरशिप आणि इतर अभिलेख यामध्ये कन्टेन्ट क्रिएशनचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. शैक्षणिक संस्था त्यांच्याकडे असलेल्या वेबपेजवरून माहिती गोळा करून एखादया विषयाबाबत आराखडा मांडून अभिलेख तयार करतात. अशा प्रकारे मिळालेली माहिती एकत्रित करून ती सर्व शैक्षणिक संस्थांना जसे ग्रंथालये, डीजिटल ग्रंथालये, पुस्तके आणि प्रकाशने यांच्या स्वरूपांत प्रसारीत करता येते.

व्यापारी कंपन्या[संपादन]

व्यापारी कंपन्यांच्या जाहिराती आणि नफा मिळविण्याच्या दृष्टीने लोकांपर्यंत पाहोचवायचे मजकूर याचा कॉरपोरेट कंन्टेन्टमध्ये समावेश आहे. यामध्ये ऑटो जनरेटेड कन्टेन्ट, ब्लॉक्स किंवा बोटस यांचा सुद्धा समावेश असतो.[६]

कलाकार आणि लेखक[संपादन]

सांस्कृतिक कार्यक्रम जसे संगीत, चित्रपट, साहित्य आणि कला इ. मध्ये समाविष्ट असलेल्या मजकूराचा सांस्कृतिक अभिलेखामध्ये समावेश आहे. पारंपारिक प्रकाशित पुस्तके आणि ई-पुस्तके ही सुद्धा त्याचाच एक भाग आहे. लेखक आणि संगीतकार यांच्याकडून होत असलेला इंटरनेटवरील वापर हा महत्त्वपूर्ण असून यामुळे सध्या या क्षेत्रामध्ये क्रांती घडून येत आहे.[७]


शासन[संपादन]

शासनाच्या कामामध्ये सुद्धा इंटरनेटचा वापर वाढत आहे. अभिलेखांचे डीजिटायझेशन, विविध अभिलेखांची ऑनलाईन मागणी , अभिलेखांचे एकत्रीकरण, अभिलेख जतन करण्याबाबतचे कायदे व त्यांची तत्परतेने अंमलबजावणी यावरून शासनाचा इंटरनेटचा वापर वाढत असल्याचे दिसून आले आहे.[८]

सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि विज्ञान या क्षेत्रामधील उदिद्ष्टे साध्य करण्यासाठी शासनाने लोकांकडून ऑनलाईन अभिलेखाची मागणी केल्यामुळे जनसंपर्क वाढून लोकांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.

वापरकर्ते[संपादन]

वेब २.० या तंत्राचा वापर सुरू झाल्यानंतर मजकूरांचे प्रसारीकरण सहजपणे करणे शक्य झाले आहे. डीजिटल माध्यमाचा वापर वाढलेला असून इंटरनेट आता घरोघरी सहजपणे उपलब्ध झालेले आहे. वयोमर्यादा , वर्गवारी अशा कोणत्याही मर्यादा या वापरासाठी उरलेल्या नाही. कोणत्याही वयाची आणि कोणत्याही वर्गाची व्यक्ती याचा सहजपणे वापर करू शकते. तरुण वर्गाकडून याचा वापर जास्तीत जास्त होत असून मजकूर तयार करण्यापासून ते त्याचे प्रसार फेसबुक, डेविअन आर्ट किंवा थंबलर इ.च्या माध्यमातून करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर तरुण पिढी कार्यरत आहे.

वादाचे मुद्दे[संपादन]

गुणवत्ता[संपादन]

माहीतीच्या प्रचंड भांडाराकडे पहाता त्याबाबतच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. योग्य अशी आवश्यक पण गुणवत्तापूर्ण माहिती आत्मसात करणे हे यापुढे वेब वापरकर्त्यांपुढील एक आव्हान ठरणार आहे.

अभिलेख वर्गीकरण[संपादन]

उपलब्ध असलली माहिती एकत्रित करणे किंवा त्याचे वर्गीकरण करणे हे काम अवघड होवून बसले आहे. लेखक आणि माहिती तयार करणा-यांचे वर्गीकरणाचे निकष वेगवेगळे असल्यामुळे वेबसाईट्स, फोरम्स आणि प्रकाशक यांच्यापुढे वर्गीकरणाबाबत बरेचदा प्रश्न निर्माण होत आहे.

बौद्धिक संपदा[संपादन]

डीजिटल कन्टेट तयार करण्यामध्ये स्वतःचे अस्तित्व ऑनलाईन जगतामध्ये सिद्ध करण्याचे आव्हान अतिशय अवघड असून भविष्यात प्रत्येक देशासाठी हा एक बौद्धिक संपदेचा विषय ठरेल.

संदर्भ[संपादन]

  1. ^ ऑडेन लि (२०१३). "मजकूर म्हणजे काय ? पहा ४० पेक्षा जास्त व्याख्या" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "dictionary.reference.com".
  3. ^ लेनहार्ट अमांडा; देबोराह फेलोज; जॉन हॉरीगन (फेब्रुवारी २००४). "ऑनलाईन मजकूर निर्मीती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ न्यूमॅन निक (सप्टेंबर २०११). "सामाजिक युगामध्ये प्रसारमाध्यामांचा प्रभाव" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ फरही पॉल (एप्रिल-मे २००९). "द टि्वटर एक्सप्लोजन" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "मजकूरांचे तयार होणे" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ पीफल मायकेल. "इंटरनेटवरील संगीतकरांचे योगदान" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2018-10-09. 2014-06-07 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "मजकूर निर्मीती" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2014-06-25. 2014-06-07 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)