Jump to content

कंकण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कंकन या पानावरून पुनर्निर्देशित)
Bangles (1129013157)
Colourful bangles at a shop, Colaba, Mumbai

कंकण हा स्त्रियांनी व पुरुषांनी हातांत घालण्याचा दागिना आहे. कंकण धातूचे ,काचेचे किंवा सुताचे सुद्धा असतात.सुताचे कंकण हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रात लग्नामध्ये नवरा व नवरी यांच्या हातामध्ये बांधण्याची परंपरा आहे.जे कंकण सोन्याचे असतात,त्यांना बांगड्या किंवा बिलवर असेही म्हणतात.कंकण चांदीचे किंवा ऑक्सिडाइज्ड असू शकतात.लग्नात कंकणाच्या जोडीला हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्यांचा चुडा भरायची पद्धत आहे.ते सौभाग्य लक्षण मानले जाते. एखाद्या गोष्टीची जबाबदारी एखाद्याने घेतली तर त्याने त्या गोष्टीसाठी 'कंकण बांधले' असा वाक्प्रचार वापरला जातो.

इतिहास

[संपादन]

वलयाच्या खाली कंकण घालतात. ‘ कंकण भूषण’ असे अमरकोशात म्हणले आहे. संस्कृत साहित्यात कंकण वारंवार उल्लेख येतो. म्हणूनच भेदीणकोश कंकण शब्दाचे करणभूषण व सूत्र असे तीन अर्थ दिलेले आहेत.[]


प्रकार

[संपादन]

चूड व अर्थचूड कंकणाचे दोन प्रकार आहेत. चूड म्हणजे लोण्याच्या तारेचे कंकण होय आणि अर्थ चूड म्हणजे तसेच बारीक कंकण होय.[]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ भारतीय संस्कृती कोष खंड १
  2. ^ भारतीय संस्कृती कोष खंड १