औषधनिर्माण उद्योग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औषधनिर्माण उद्योग हा एक जागतिक स्तरावरचा सतत वाढ होत असलेला उद्योग आहे. एक नवीन औषध बाजारात येण्यापूर्वी त्यावर अनेक वर्षे संशोधन होते, कोट्यावधी रुपये खर्च होतो. मनुष्यजातीसाठी ते सुरक्षित असल्याची खात्री केली जाते. मगच औषधनिर्माण उद्योग औषध बाजारात विक्रीस आणू शकतो.


भारताची स्थिती[संपादन]

इ.स. १९४८ मध्ये भारतात औषधनिर्माण उद्योगामधील वार्षिक उलाढाल १० कोटी रुपये होती. इ.स. १९७२ मध्ये ३६० कोटी, इ.स. १९८० मध्ये १५०० कोटी व आज ती १ लाख कोटी रुपयांच्यावर गेली आहे. यापकी सुमारे ५५००० कोटी रुपये देशांतर्गत उलाढालीतून मिळतात. औषधनिर्माण उद्योगा मधून होणाऱ्या निर्यातीतून ४०००० कोटी रुपये मिळतात. एकूण निर्यातीत हा वाटा ५ टक्के आहे. अमेरिका, युरोप अशा प्रगत व खूप कठोर निकष असलेल्या देशातही भारतीय औषधनिर्माण उद्योग निर्यात करतो. औषधांच्या बाबतीत भारत पूर्णपणे स्वावलंबी आहे. सुमारे ९००० कोटी रुपयांच्या औषधांची आपण आयात करतो. पण त्यामागे मुख्यत: ती स्वस्त पडतात किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना ते जास्त सोयीचे आहे अशी कारणे आहेत.

उत्पादन[संपादन]

डॉ. पी.सी.रे यांनी इ.स. १८८२ मध्ये बेंगाल केमिकल्स अन्ड फार्मास्यूटीकल्स ही देशी कंपनी सुरू केली. त्यावेळेस इतर सर्व परदेशी कंपन्याच भारतात होत्या. नंतर इ.स. १९०७ मध्ये अलेंबिक नावाची कंपनी सुरू झाली. इ.स. १९३५५ मध्ये सिप्ला ही कंपनी सुरू झाली व आज ती एक बलाढ्य कंपनी आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.