ओम राऊत
ओम राऊत | |
---|---|
जन्म |
२१ डिसेंबर १९८१ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, निर्माता |
प्रमुख चित्रपट | लोकमान्य : एक युगपुरुष |
वडील | भारतकुमार राऊत |
अधिकृत संकेतस्थळ | http://neenarautfilms.com/ |
ओम राऊत (जन्म २१ डिसेंबर १९८१) हे भारतीय लेखक, चित्रपटदिग्दर्शक आणि निर्माते आहेत. ओम राऊत हे त्यांच्या 'लोकमान्य : एक युग पुरुष' या पहिल्या मराठी चित्रपटासाठी ओळखले जातात. या चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि प्रिया बापट [१]यांनी प्रमुख भूमिका बजावल्या आहेत.
कारकीर्द[संपादन]
ओम राऊत यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात अजय कार्तिक दिग्दर्शित 'करामती कोट'(१९९३) या चित्रपटामधून बाल कलाकार म्हणून केली[२][३]. अमेरिकेत असताना यांनी ओम राऊत भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. दार मोशन पिक्चर्संमध्ये क्रिएटिव्ह हेड पदावर काम करताना समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'लालबाग परळ' आणि 'हॉन्टेड ३-डी' यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीमध्ये त्यांचा हात होता[४]. नुकतीच त्यांनी दादर येथील सावरकर स्मारक येथे सावरकरांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य 'लाईट ॲन्ड साऊंड शो'ची निर्मिती केली आहे. .[५]
लोकमान्य : एक युग पुरुष[संपादन]
ओम राऊत यांनी २०१२ मध्ये 'नीना राऊत फिल्म्स'ची सुरवात केली. नीना राऊत फिल्म्सची पहिली निर्मिती 'लोकमान्य : एक युग पुरुष' या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरवात केली. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याचबरोबर समीक्षकांनीही या चित्रपटाला गौरविले.
ओम राउत यांनी झी टॉकिजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ’लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविणे हे माझे स्वप्न होते आणि म्हणूनच मी गेली तीन वर्षे या विषयावर खूप अभ्यास केला. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सात महिने लागले आणि या काळात माझ्या सगळ्या सहकार्यांनी खूप मेहनत घेतली आणि माझी पूर्ण खात्री आहे की आमच्या चित्रपटाला खूप यश मिळेल ".[६]
- गोव्यात २०१४ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पॅनोरमा या विभागासाठी ‘लोकमान्य: एक युग पुरुष’ या चित्रपटाची निवड झाली होती.[७]
- नीना राऊत फिल्म्सने या चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी एक कोटी तीस लाख रुपये खर्च केले.[७]
- प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला[ संदर्भ हवा ] त्याप्रमाणेच समीक्षकांनीही या चित्रपटाला गौरविले. 'द टाइम्स ऑफ इंडिया ' या इंग्रजी वृत्तपत्राने या चित्रपटाला ४ स्टार्स दिले आणि त्यांनी पुढे असेही नोंदवले की "मराठी चित्रपटाला फार कमी वेळा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, आणि 'लोकमान्य : एक युग पुरुष' हा त्यापैकीच एक आहे.".[८]
'स्वातंत्र्यवीर' लाईट ॲन्ड साऊंड शो[संपादन]
दादर येथील 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, येथे 'स्वातंत्र्यवीर' लाईट ॲन्ड साऊंड शो’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम ओम राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेला गेला आहे.‘ हा भव्य, नावीन्यपूर्ण कार्यक्रम भारतीय क्रांतिकारक 'स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर' यांच्या जीवनावर आधारित आहे. नावीन्यपूर्ण व अत्याधुनिक ध्वनिप्रकाश साधनांचा वापर करून हा कार्यक्रम दाखवला जातो. या कार्यक्रमासाठी कायमस्वरूपी पहिल्या आणि सर्वात मोठ्या ३-डी वॉलमॅपिंगचे तंत्रज्ञान वापरले आहे. विशेष म्हणजे, कायमस्वरूपी चालणार्या या भव्य ‘लाईट ॲन्ड साऊंड शो’मुळे केवळ मुंबईचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान सन्मानाने उंचावली आहे..[९]
संदर्भ[संपादन]
- ^ Om Raut, bookmyshow Biography
- ^ "Karamati Coat". www.childrensfilmsouthasia.org. Retrieved 2016-02-26
- ^ "Karamati Coat (The Miraculous Coat) | Children's Film Society, India". cfsindia.org. Retrieved 2016-02-26.
- ^ http://www.nytimes.com/reviews/movies
- ^ https://www.facebook.com/om.raut/videos/vb.370306406484297/532932620221674/?type=2&theater
- ^ http://www.zeetalkies.com/celebs-speak/it-was-my-dream-to-make-a-film-on-lokmanya-tilak-om-raut.html
- ↑ a b http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/1-3-cr-spent-on-Lokmanyas-visual-effects/articleshow/45473283.cms
- ^ http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/Lokmanya-Ek-Yugpurush/movie-review/45728175.cms
- ^ http://www.india.com/marathi/entertainment/light-and-sound-show-on-swatantyaveer-savarkar-by-om-raut/