ओड्रपीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


औण्ड्रपीठ

प्रस्तावना[संपादन]

सर्व मंगलकारकांची मगलरूप असणारी स्वतः कल्याणशिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरूषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी, अशा हे नारायणी देवी तुला मी नमन करतो. आदी काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये नारीच्या विवीध रूपांना आदिशक्तीच्या स्वरूपात पुजीले जात आहे. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महामंगल आहे, त्याच्यापुढे नतमस्तक होणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. म्हणुनच सृष्टीतील ज्या शक्तीचे रहस्य मानवाला कळले नाही त्या शक्तीभोवती त्याने देवत्वाची वलये गुंफली आणि तीची उपसना करू लागला. सिंधु संस्कृती पासून ते पुराणांमध्ये आदिशक्तीच्या विवीध रुपांना गौरविलेले दिसून येते. आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट, विश्वाकार आहे. चंद्रसुर्याचे नेत्र असलेली, हरितसृष्टीचे वस्त्र परिधान करणारी, नवजीवनाचे चैतन्य पसरवीणारी, प्रसंगी स्वकर्तव्याची कठोर जाणीव करून देणारी, कधी वात्सल्यसिंधू तर कधी रणचंडीचे उग्र रूप धारण करणारी ही आदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतिकांतुन प्रकट होते.

पार्श्वभूमी[संपादन]

वडार समाजातील आजच्या समाज रचनेत नारीचे स्थान पाहता, सर्व भूमिका पुर्णत्वाला नेणारी परंतु सन्मानाच्या व आदराच्या स्थानापासून वंचीत अशीच काहीशी परिस्थीती आहे. गेल्या काही दशकातील वडार समाजाच्या प्रगतिचा गाडा हा स्त्रियांनीच प्रगतीच्या मार्गावर आणल्याचे आपल्याला प्रकर्षाने जाणवून येईल. वडार समाजाच्या इतिहासाची चर्चा करायला गेल्यास जनमाणसात शिव-पार्वतीची गोष्टीच चर्चीली जाते. वडार स्त्रिया चोळी का घालत नसत याचा संबंध सितेशी जोडून त्याबद्दलच्या अख्यायीकाच नवतरूणांच्या समक्ष उपस्थित केल्या जातात. वडार समाजातील स्त्रिया या पुरूषांच्या बरोबरीने आज समाजाच्या स्थिरीकरणास हातभार लावत आसून ख-या अर्थाने आदिशक्तीच्या आपल्या मधील अंशाचे प्रकटीकरण आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमधून करत आहे. वडारसमाज आणि आदिशक्ती हीचा प्राचीन संबंध या असून या प्राचीन ज्ञानाची गंगा हळूहळू समाजातील महिला, नवशिक्षीत तरूण वर्गापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.

साडेतीन शक्तीपीठे[संपादन]

कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदास्थिता।

मातु:पुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ।।

तुळजापुरं तृतीय स्यात सप्तशृंग तथैव च।।

महाराष्ट्रात देवीची (आदिशक्तीची) साडेतीन शक्तीपीठे सुप्रसिद्ध आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी, माहुरची रेणूका, तुळजापुरची तुळजाभवाणी ही पुर्णपीठे असून वणीचे सप्तश्रृंगी हे अर्धपीठ मानले जाते. क्वचीतच एखादा वडार बांधव असेल की जो या देवींचे पुजन करत नसेल. अख्खा महाराष्ट्र य आदिशक्तींपुढे नत मस्तक होतो. परंतु आपणास हे कदाचित महित नसेल वडार समाजातील पुर्वज जेथे राज्य करीत होते त्या क्षेत्रालाही पुर्ण पीठाचा दर्जाहोता. कालिका पुराणानुसार तर “औंड्रपीठ” हे प्रथम पीठ मानले जाते. शैव परंपरतील महत्त्वाची जमात म्हणून वडर (औड्र) समाजास सदरचा सन्मान मिळालेला असेल यात शंका नाही.

महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन शक्तीपीठे जरी असली तरी देवीची काश्मीर, कांची व कामाख्या अशी तीन प्रमुख पीठे आहेत. परंतु या तीन पीठांबरोबर एकूण 52 शक्तिपीठांना शास्त्रात मान्यता आहे. प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी एक भैरव आणि एक शक्ती असते अशी श्रद्धा आहे. प्रत्येक ठिकाणच्या भैरवाचे आणि शक्तीचे नाव वेगळे असते. बहुतेक पुराणांत शक्तिपीठांची संख्या एकावन्न मानलेली असली, तरी काही ग्रंथातून ही संख्या वेगवेगळी –चार, सात, आठ, अठरा, बावन्न इ. दाखविण्यात आलेली आहे. देवी भागवतात एकशे आठ पीठांचा निर्देश असून तेथे फक्त पीठस्थाने आणि त्याच्या अधिदेवता एवढेच तपशील दिले आहेत. ह्या शक्तिपीठांचा उदगम दोन पुराणकथांशी निगडित आहे.

शक्तिपीठांच्या कथा[संपादन]

पहिल्या कथेत दक्ष प्रजापतीची मुलगी सती (पार्वती) ही शंकराला दिलेली होती. दक्ष प्रजापती आणि शंकर या दोघांत वितुष्ट होते. पुढे दक्ष प्रजापतीने ‘बृहस्पतिसव’ नावाचा यज्ञ करावयाचा ठरविले. ह्या यज्ञाचे आमंत्रण शंकराला मात्र दिले नाही. तथापि सती मात्र पतीचा विरोध असताही हट्टाने त्या यज्ञप्रसंगी उपस्थित राहिली. त्या वेळी प्रत्यक्ष पित्याकडून झालेला अपमान असह्य होऊन सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःस जाळून घेतले. शंकराला हे समजल्यानंतर त्याने आपल्या जटेतून वीरभद्राला उत्पन्न केले व त्याच्याकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून दक्षालाही ठार मारले आणि दु:खावेगाने यज्ञस्थळी जाऊन शंकराने सतीचे निष्प्राण शरीर मस्तकावर घेऊन तांडव नृत्य सुरू केले. तांडव नृत्य म्हणजे शंकराचे विनाशकारी स्वरूप होय. भगवान शंकराला शांत करण्याच्या हेतूने विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या पार्थिवाचे अवयव तोडण्यास प्रारंभ केला. सतीच्या मृत देहाची अंग-प्रत्यंगे जेथे जथे पडली, तेथे तेथे शक्तिपीठे निर्माण झाली.

शक्तिपीठांच्या निर्मितीसंदर्भात जी दुसरी पुराणकथा आहे ती अशी : विष्णुभक्त अंबरीष राजाच्या एकादशीच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास मुनी आपल्या साठ हजार शिष्यांसह सकाळीच ह्या राजाकडे आले. त्या दिवशी राजाच्या व्रताचे उद्यापन होते. दुर्वास ऋषी वेळेवर न परतल्याने त्यांच्यासारख्या थोर अतिथीला सोडून व्रताचे उद्यापन करायचे, की अतिथी आल्यावर जेवून व्रत मोडायचे हा प्रश्न राजाला पडला. शेवटी राजाने तुळशीचे तीर्थ घेऊन उपवास सोडला आणि भोजनासाठी आलेल्या इतर लोकांना जेवू घातले. झाल्या प्रकाराने दुर्वास संतापले आणि त्यांनी राजाला शाप दिला, की ह्या व्रताचे फळ तुला मिळणार नाही आणि तुला शंभर जन्म घ्यावे लागतील. मग विष्णूने अंबरीषाला त्या शापापासून अभय दिले आणि विष्णूसह सर्व देवांनी दुर्वासांच्या शापवाणीने अंबरीषाला मिळणारे शंभर जन्म आपसात वाटून घेतले. त्यांपैकी एकावन्न जन्म देवीने स्वीकारले. त्यामुळे एकावन्न शक्तिपीठे निर्माण झाली.

==औंड्रपीठ== अशा या पीठांच्या उल्लेखात “औंड्रपीठ” चाही ऊल्लेख विवीध ग्रंथात, पुराणात आढळूण येतो. विष्णू पुराणात कमला स्त्रोत्राचा उल्लेख आढळूण येतो. सुख- समृद्धिच्या प्राप्तीसाठी कमाला स्त्रोत्राचे पठन लाभकारी ठरतो. या कमला स्त्रोत्रामध्ये सुद्धा आपणास देवीचा उल्लेख खालील प्रमाणे आढळतो.

कालिका त्वं कालिघाटे कामाख्या नीलपर्वत ।

विरजा ओड्रदेशे त्वं प्रसन्ना भव सुंदरि ॥

अर्थ- हे देवी, तु लालीघाटावर काली कालिका , नीलपर्वत पर कामाख्या आणि औड्र देशात विरजारूपात विराजमान आहेस. हे सुंदरी ! तु सदा आमच्यावर प्रसन्न रहा. तसेच कालिका पुराणानुसार प्रथम पीठ 'औंड्र पीठ' आहे.

"औंड्राख्यं प्रथमं पीठं द्वितीयं जालशैलकम्।

औंड्रपीठं पश्चिमे तु तथैवोंड्रेश्वरी शिवाम्।

कात्यायनीं जगन्ना मो ड्रेशं च प्रपूजयेता॥"

          हे औण्ड्रपीठच ओडिसा असून येथे वडार समाजाचे पुर्वज आपल्या सुवर्ण कालखंडात आपल्या राज्यावर शासन करत होते. याजपुर येथे विरजा देवी या देवीचे स्थान असून उत्कल म्हणजेच उडीशाची ती प्रधान देवी आहे जिचे वर्णन ब्रह्मपुराण मध्ये खालील प्रमाणे आढळूण येते.

विरजे विरजा माता ब्रह्माणी संप्रतिष्ठिता।

यस्याः संदर्शनात्मर्त्यः घुनात्या सप्तमं कुलम्॥

असा आदिशक्ती व वडार समाजाच्या पुर्वजांचा प्राचिन संबंध असून वडार समाजातील सर्वांनी याची दखल घेवून या इतिहासाचा प्रसार वडार समाजात व इतर समाज बांधवांपर्यंत केला पाहिजे हे मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते.

हे सुद्धा पहा[संपादन]