ओट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओट (Avena sativa) हे युरोप व अमेरिका येथे वापरात असलेले एक एकदलिक धान्य आहे. याच्या पिकाला थंड, ओलसर हवा आणि मध्यम जमीन लागते. त्यामुळे ओटचे पीक भारतात हिमालयाच्या असलेल्या प्रदेशांत अल्प प्रमाणात घेतले जाते. ओटचे तुसे काढलेले दाणे भट्टीत भाजून त्याचे पीठ करतात व पिठाची बिस्किटे करतात. भारतात ओटचे पोहे मिळतात. ते शिजवून पाण्यात वा दुधात भिजवून सकाळी न्याहारी म्हणून खातात. ओटच्या पोह्यांची खीर बनते तसेच उत्तप्पाही करता येतो. ओटची न्याहारी केल्यास वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते, यासाठी हल्ली भारतातील सुधारलेले लोक ओटची न्याहारी करतात..


पहा : यव; सातू; बार्ली; जवस


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

विकिपीडिया:वनस्पती/यादी