ओझर्डे, वाळवा तालुका
ओझर्डे हे वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे ३,००० इतकी आहे. हे गाव शिराळा विधानसभा मतदार संघात मोडते.
अद्याप पुरेशी पाण्याची सोय उपलब्ध नाही. गावाचे ग्रामदैवत हनुमान मंदिर आहे. हे गाव पेठनाक्यापासून पश्चिमेला ५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या गावामध्ये नलावडे पाटील ही भावकी मुख्य आहे. गावाच्या दक्षिणेला तिल्गंगा ही नदी असून त्याचा उगम करमाळे तालुका शिराळा येथे होतो. गावामध्ये गणपती व दत्ताचे मंदिर आहे.
गावामध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात झाडी असल्यामुळे सुरूल-पेठ रस्त्याने जाताना हे गाव सहजसहजी दिसत नसे. या गावातील शेंड प्रसिद्ध आहे. गावातील बऱ्याच लोकांचे श्री जोतीबा हे कुलदैवत आहे. दरवर्षी गावामध्ये एप्रिल महिन्यात हनुमानाची यात्रा भरते.
गावातील बहुसंख्य युवक भारतीय लष्करामध्ये भरती झालेले आहेत. देश्सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांचा गावाला अभिमान आहे. काश्मीर, पंजाब, राजस्ठान तसेच पूर्वेकडील अनेक राज्यामध्ये गावातील युवक सीमेवर पहारा देत आहेत. मिलिटरी ओझर्डे म्हणून या भागात ओळख निर्माण होत आहे.