ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय
ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय ही ऑस्ट्रेलियातील् पहिली मराठी शाळा आहे. सिडनीमधील कॅम्पबेल टाऊन परिसरातील ग्लेनवूड पब्लिक स्कूल या शाळेत दर रविवारी दुपारी अडिच ते पाच या वेळेत ही शाळा भरते. दि. १० फेब्रुवारी २००८ रोजी या शाळेचा पहिला के.जी.चा वर्ग सुरू झाला. या ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाचे सर्व कामकाज व शिक्षणपद्धती ही तेथील सरकारी नियमानुसार आणि मार्गदर्शनाखाली चालवले जाते.[१]
ऑस्ट्रेलियात कम्युनिटी लँग्वेज स्कूल्स नामक सरकारी योजना आहे. त्या अंतर्गत इतर भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन व आनुदान मिळते. ग्लेनवूड पब्लिक स्कूलने मराठी शाळेसाठी ही जागा मोफत उपलब्ध केली आहे. २०१२साली अखेर इयत्ता ५ पर्यंतचे वर्ग या शाळेत सुरु झाले आहेत. ५ शिक्षक व १० कार्यकर्ते, यांच्या सहभागातून ५७ विद्यार्थ्यांनी आपली मातृभाषा येथे शिकतात. शाळेची सुरुवात प्रथम जन गण मन आणि नंतर ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रगीत म्हणून होते.
संकेतस्थळ[संपादन]
ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय संकेतस्थळ
संदर्भ[संपादन]
- ^ ऑस्ट्रेलियात सुरू आहे मराठी शाळा म्.टा 12 Feb 2012
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |