Jump to content

ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोके क्लब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोके क्लब
चित्र:All England Lawn Tennis and Croquet Club logo.jpg
स्थापना २३ जुलै, १८६८ (1868-07-23) (वय: १५६)
वैधानिक स्थिति खाजगी कंपनी
मुख्यालय चर्च रोड, विम्बल्डन, लंडन, SW19 5AE
स्थान
सदस्यत्व (२०१७[])
५६५[]
वरदहस्तक
कॅथेरीन (वेल्सची राजकुमारी)
मुख्याधिकारी
सॅली बोल्टन
Chair of the Board
डेबी जेव्हान्स

ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रोके क्लब [] ( एईएलटीसी ) तथा ऑल इंग्लंड क्लब हा इंग्लंडच्या लंडन शहराील खाजगी सदस्यांचा क्लब आहे. विम्बल्डन उपनगरातील या क्लबमध्ये हे विम्बल्डन स्पर्धा खेळली जाते. ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा अजूनही गवतावर खेळली जाते. या स्पर्धेची ख्याती आता क्लबपेक्षा अधिक आहे.

या क्लबमध्ये २७५ पूर्ण सदस्य, सुमारे १०० तात्पुरते खेळणारे सदस्य आणि अनेक मानद सदस्य आहेत. पूर्ण किंवा तात्पुरता सदस्य होण्यासाठी, अर्जदाराने चार विद्यमान पूर्ण सदस्यांकडून समर्थन पत्र प्राप्त करणे आवश्यक आहे, त्यापैकी दोन अर्जदारास किमान तीन वर्षांपासून ओळखत असले पाहिजेत. त्यानंतर उमेदवारांच्या यादीत नाव जोडले जाते. क्लबच्या समितीद्वारे वेळोवेळी मानद सदस्य निवडले जातात. सदस्यांना विम्बल्डन स्पर्धेच्या प्रत्येक दिवसासाठी दोन तिकिटे खरेदी करण्याचा अधिकार आहे. या व्यतिरिक्त सर्व स्पर्धाविजेत्यांना सदस्य होण्यासाठी आमंत्रित केले आहे. []

या क्लबची स्थापना सहा लोकांनी २३ जुलै, १८६८ रोजी ऑल इंग्लंड क्रोके क्लब म्हणून केली. त्यावेळी क्रोकेचा खेळ लोकप्रिय होता.[] १८७०मध्ये येथे पहिली क्रोके स्पर्धा आयोजित केली गेली. १८७५मध्ये येथे लॉन टेनिस खेळणे सुरू झाले. उद्देश [] पहिली पुरुषांची एकेरी टेनिस स्पर्धा जुलै १८७७ मध्ये आयोजित केली गेली. त्यावेळी क्लबने आपले नाव बदलून ऑल इंग्लंड क्रोकेट आणि लॉन टेनिस क्लब केले . त्या वर्षी सर्व्हिस अंडरआर्म करणे भाग होते. पहिल्या विजेत्या स्पेन्सर गोर यांच्या मते "लॉन टेनिस कधीच महान खेळ होणार नाही." १८७८ मध्ये कोर्टच्या मध्यातील जाळीची उंची बदलून टोकांना ४ फूट ९ इंच (१.४५ मी) आणि मध्यावर ३ फूट (०.९१ मी) इतकी करण्यात आली. [] टेनिसची लोकप्रियता वाढल्यावर १८८२मध्ये क्लबने आपल्या नावातून क्रोके वगळले. १८९९मध्ये ते पुन्हा घातले. तेव्हापासून क्लबचे नाव ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रोकेट क्लब आहे.

छप्पर घालण्यापूर्वीचे सेंटर कोर्ट
२०२२मध्ये क्लब
छप्पर घातलेले सेंटर कोर्ट
२०१९मध्ये क्र १ कोर्ट

१९५१पर्यंत या क्लबमध्ये कृष्णवर्णीय खेळाडूंना खेळण्याची परवानगी नव्हती तसेच १९५२पर्यंत ज्यूंना प्रवेश नव्हता.  १९५६मध्ये जिंकलेल्या अँजेला बक्स्टनला अद्यापही सदस्य करून घेतलेले नाही. १९५०पासून ती प्रतीक्षा यादीवरच आहे. [] [] [] [१०]

२००६मध्ये क्लबच्या अध्यक्ष टिम फिलिप्सने सांगितले की स्पर्धेत पुरुष आणि महिलांना समान बक्षीस रक्कम देणे हे त्यांना "पुरुषांसाठी योग्य असे वाटत नाही" (पुरुष पाच सेट खेळतात तर महिला तीन). क्लबने पुढील वर्षापासून समान बक्षीस रक्कम देणे सुरू केले. [११]

हे देखील पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Want To Become A Wimbledon Member? Win It (Or Marry A Prince)". Forbes. 18 June 2017. 9 July 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 July 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "About the AELTC". www.wimbledon.com. 9 July 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 July 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "The All England Lawn Tennis Club," Wimbledon.org, accessed 29 June 2009 Archived 2009-06-12 at the Wayback Machine.
  4. ^ "Anyone for a game of sphairistiké?" Archived 2015-07-05 at the Wayback Machine. 41, The Northern Echo, 27 June 2009, accessed 8 July 2009
  5. ^ Empty citation (सहाय्य).
  6. ^ Empty citation (सहाय्य).
  7. ^ Schoenfeld, Bruce, "The Match: Althea Gibson & Angela Buxton: How Two Outsiders—One Black, the Other Jewish—Forged a Friendship and Made Sports History" (2004), pp. 279–80, Amistad, आयएसबीएन 0-06-052652-1, आयएसबीएन 978-0-06-052652-8
  8. ^ Empty citation (सहाय्य)
  9. ^ Empty citation (सहाय्य).
  10. ^ Empty citation (सहाय्य).
  11. ^ "Wimbledon serves up equal pay for women" Archived 2011-06-07 at the Wayback Machine., Daily Times, 23 February 2007, accessed 8 July 2009