ऑनलाइन जाहिराती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑनलाईन जाहिराती या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑनलाईन जाहिराती म्हणजेच इंटरनेट जाहिराती, ग्राहकांपर्यंत वस्तूंच्या विक्रीकलेबाबतची माहिती पोहोचविण्यासाठी वापरतात. यामध्ये ईमेल विपणन, शोध इंजिन विपणन, सामाजिक मीडिया विपणन अशा वेगवेगळया दर्शनीय जाहिरातींचा समावेश आहे. इतर जाहिरात माध्यामांप्रमाणेच ऑनलाईन जाहिरातीमध्ये सुद्धा प्रकाशक आणि जाहिरातदार एकत्र काम करताना दिसतात. प्रकाशक ऑनलाईन जाहिराती एकत्र करून जाहिरातदाराकडे प्रदर्शित करण्यासाठी देतो. यामध्ये जाहिरात संस्थांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. जाहिरात संस्था जाहिरात स्वतः तयार करतात आणि आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून त्या जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न स्वतंत्रपणे करतात.

ऑनलाईन जाहिराती हा सध्याचा मोठया प्रमाणावर चालणारा व्यापार आहे आणि दिवसेंदिवस याचा आवाका वाढत आहे. युनायटेड स्टेटस सारख्या ठिकाणी इंटरनेट जाहिरातीद्वारे मिळणारा महसूल दृक - श्राव्य माध्यामातून मिळणा-या महसूलापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.[१]

इतिहास[संपादन]

सुरुवातीच्या काळात एआरपीएएनईटी (ARPANET) आणि एनएसएफएनईटी (NSFNET) सारख्या इंटरनेटचा वापर करणा-या कंपन्यांनी इंटरनेटचा वापर नफा कमावणा-या संस्थांनी व्यापारी कामासाठी न करण्याचे धोरण स्विकारलेले होते.[२][३] 1991 मध्ये एनएसएफएनईटी (NSFNET) ने या धोरणाला नाकारून इंटरनेटचा वापर व्यापारी फायदयासाठी करण्यासाठी घातलेले सर्व निर्बंध झुकारून देण्याचे ठरविले.[४][५][६][७][८]

१८ जानेवारी १९९४ मध्ये ॲण्डूज युनिव्हर्सिटी सिस्टीम ॲडमिनिस्टेटरने एक धार्मिक घेाषणा नेटवर्क वापरणा-यांना मेलद्वारे पाठविली.[९] त्यानंतर चार महिन्यांनी लॉरेन्स कान्टर आणि मार्था सीगेल या वकिली व्यवसाय करणा-या जोडगोळीने यूझनेटच्या माध्यामातून त्यांच्या वकिली व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी ई मेलचा वापर केला.[१०] अशा प्रकारे ऑनलाईन जाहिरातींचा श्रीगणेशा झाला.

१९९३ मध्ये ग्लोबल नेटवर्क नेविगेटर यांनी पहिली क्लिक करता येणारी वेब जाहिरात सिलिकॉन व्हॅलि या विकीली व्यवसाय करणा-या संस्थेला विकली.[११]

१९९८ मध्ये गो.टू.कॉम ही पहिली सर्च जाहिरातींची प्रणाली तयार झाली , जी २००१ मध्ये ओव्हरचर या नावाने ओळखली गेली आणि २००३ मध्ये याहू ने ताब्यात घेतली.[१२] गूगल ने २००० मध्ये सर्च जाहिरातींची कार्यप्रणाली विकसित केली.[१३]

बटवडा पद्धती[संपादन]

प्रदर्शनीय जाहिराती[संपादन]

शब्द, चिन्ह, हलती चित्र, दृश्यचित्रवाणी, छायाचित्र किंवा इतर डोळयांना आकर्षून घेणा-या साधनांचा वापर करून दर्शनीय जाहिरातींचा मजकूर तयार केला जातो. जाहिरातींचा ग्राहकांवर प्रभावी परिणाम करण्यासाठी दर्शनीय जाहिरात हा उत्तम पर्याय आहे.

वेब बॅनर जाहिराती[संपादन]

वेब पानामध्ये डोळयासमोर दिसणा-या आकृत्यांचा / चिन्हांचा वापर करून सेंट्रल ॲड सर्व्हरच्या मदतीने या जाहिराती बनविल्या जातात.

जावा अपीलेटस, एचटीएमएल ५ , अडोब पलॅश आणि असेच इतर कार्यप्रणाल्या वापरून दूरचित्रवाणी, चलतचित्र, बटणे, चिन्हे अशाद्वारे बॅनर जाहिराती जास्तीत जास्त प्रभावी बनविल्या जातात.[१४]

चौकट जाहिराती[संपादन]

बोलीभाषेचा वापर करून दिलेली जाहिरात ही पारंपारिक चौकट जाहिरात आहे. वेबसाईटचा प्रकाशक वेब पेजवर चौकट जाहिरातींसाठी ठराविक जागा नेमून देतो.

पॉप्स अप्स / पॉप्स अण्डर[संपादन]

वेबसाईट विझिटर्स इनिशिअल बॉऊझर विण्डो वापरून या जाहिराती दिसू शकतात.

तरंगती जाहिरात[संपादन]

ठराविक वेळेनंतर दिसेनाशी होणारी किंवा कमी जास्त आकारात पुढे मागे सरकणारी अशी ही तरंगती जाहिरात खूपच प्रभावी आहे.

पसरत जाणारी जाहिरात[संपादन]

कमी जागेमध्ये जास्तीत जास्त मजकूर / माहिती अशा प्रकारच्या जाहिरातीमध्ये मावते. माऊसच्या सहाय्याने सदर जाहिरातीतील आकारमान ठरवून दिलेल्या वेळेत पसरत जाते.[१५][१६][१७]

कौशल्यपूर्ण बॅनर्स[संपादन]

संचालन प्रणाली किंवा अर्जेचा वापर करून अशा प्रकारची जाहिरात बनवली जाते.

शब्द जाहिराती[संपादन]

चित्रांच्या माध्यमातून होणा-या जाहिरातींपेक्षा शब्दांबर आधारित जाहिरात सर्वांत वेगवान समजली जाते.[१८] शब्द, वाक्य आणि वाक्यप्रयोग इ.चा एकत्रित वापर करून हायपरलिंकद्वारे ही जाहिरात प्रसारित केली जाते.

सर्च इंजिन मार्केटिंग (एसईएम)[संपादन]

कोणत्याही प्रकारची माहिती शोधताना वेबसाईटची दृश्यता (visibility) वाढविण्यासाठी तयार केलेले आहे. वेबसर्चर व्यक्तींच्या श्ंकाचे समाधान एसईएम द्वारे केले जाते.[१३]

सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन (एसईओ)[संपादन]

वेबसाईटमध्ये सर्च शी संबंधित समाविष्ट केलेल्या मजकूराची श्रेणी वाढविण्याचा प्रयत्न एसईओ द्वारे केला जातो.[१९]

स्पोन्सर्ड सर्च[संपादन]

याला स्पोन्सर्ड लिंक / सर्च जाहिराती असेही म्हणतात.

सामाजिक माध्यम विक्रीकला[संपादन]

सामाजिक माध्यम वेबसाईटवरून ब-याचशा संस्था त्यांच्या वस्तूंची अदयायावत तपशील देऊन व त्यासाठी ग्राहकांना विशेष प्रसंगी भेटवस्तू देऊन जाहिरातीचा हा पर्याय निवडतात.[२०]

मोबाईल जाहिरात[संपादन]

वायरलेस मोबाईलमधून – जसे स्मार्टफोन , फिचर फोन किंवा टॅबलेट इ.मधून केलेल्या जाहिरातीला मोबाईल जाहिरात म्हणतात. मोबाईल वापरणा-यांची संख्या, त्याचा वेग, संपर्क कक्षा यामध्ये दिवसेदिवस सुधारणा होत असल्यामुळे हे माध्यम सध्या सर्वांत लोकप्रिय ठरलेले आहे.

ई मेल जाहिरात[संपादन]

संपूर्ण ई मेल किंवा त्यातील कही भाग या जाहिरातींच्या स्वरूपात प्रसारित केला जातो.

ऑनलाईन वर्गीकृत जाहिराती[संपादन]

वेगवेगळया वर्गामधील उदा. ऑनलाईन नोकरी, ऑनलाईन बँकाची यादी, ऑनलाईन लिलावाची यादी इ. द्वारे केलेल्या जाहिराती या प्रकारात मोडतात.

ॲडवेअर[संपादन]

ही आज्ञावली कार्यान्वित केल्यास संगणकावर आपोआप जाहिराती दिसू शकतात.

परतफेडीच्या पद्धती[संपादन]

सीपीएम (प्रति हजारामागे दर)[संपादन]

जाहिरातदार प्रत्येकी 1000 मजकूराच्या प्रदर्शनासाठी ग्राहकाला जी ठराविक रक्कम प्रदान करतो त्याला सीपीएम असे म्हणतात. ऑनलाईन जाहिरात प्रदर्शन म्हणजेच ठसा उमटविणे असा आहे.[२१] वेब बगससारखे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जाहिरातदार ठसा खरोखरच ग्राहकांपर्यंत पोहोचला किंवा कसे याची खात्री करु शकतो.

सीपीसी (प्रति टिचकीमागे दर)[संपादन]

जाहिरातदार प्रत्येक वेळी जाहिरातीवरील टिचकीमागे जी रक्कम प्रदान करतो त्याला सीपीसी असे म्हणतात. व्हिजिटर्सनी जर त्यांच्या साईटला प्रत्यक्ष भेट दिल्यास जाहिरात प्रभावी असल्याचे मानले जाते.

ऑनलाईन जाहिरातींचे फायदे[संपादन]

किंमत[संपादन]

ऑनलाईन जाहिरातींच्या तुलनेत ऑनलाईन जाहिरातींचा दर कमी असून इतर माध्यमाच्या तुलनेने खूपच प्रभावी आहे.[२२]

मोजमाप[संपादन]

ऑनलाईन जाहिरातदार जाहिरातीच्या परिणामकारकतेनुसार ग्राहकांच्या संख्येबाबतचा किंवा ग्राहकांच्या प्रतिसादाबाबतचा तपशील गोळा करु शकतो.

बांधणी[संपादन]

जाहिरातदार मजकूर जास्तीत जास्त आकर्षिक करण्यासाठी वेगवेगळया प्रतिमा, दूरचित्रवाणी, लिंक्स इ. मार्गांनी जाहिरातीची बांधणी करु शकतो , जेणेकरून या जाहिरातीमुळे ग्राहक वर्ग तयार करता येईल.

लक्ष्य[संपादन]

ऑनलाईन जाहिरातींसाठी कोणताही भौगोलिक अडसर प्रसारीत होण्याच्या मार्गात येत नाही.

आवाका[संपादन]

ऑनलाईन जाहिरातींमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धा करता येणे सहज शक्य झाले आहे.

वेग[संपादन]

ऑनलाईन जाहिरातींचा वेग इतर कोणत्याही माध्यामातून प्रसारित होणा-या जाहिरातींपेक्षा जलद आहे. तसेच या जाहिरातीमध्ये सुधारणा किंवा काही बदल करावयाचे असल्यास ते सुद्धा जलद गतीने करता येणे शक्य आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ ""आयएबी इंटरनेट जाहिरातींचा महसूल अहवाल : २०१२ चा संपूर्ण तपशील"" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ ""माहितीचे धोरण"" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-08-24. 2013-11-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ टेम्प्लेटन, ब्रॅड (२००८). ""स्पॅमच्या २५ व्या वर्धापनदिनी आढावा"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ ""एनएफएसवएनईटी-नॅशनल सायन्स फौउंडेशन नेटवर्क"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ ""द इंटरनेट"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ लेस्टर, लिंडा. "इंटरनेटचे व्यापारीकरण : एनएसएफएनईटीची नवीन संपर्क दळणवळणांच्या साधनाकडे वाटचाल" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2010-05-05. 2013-11-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ पाकस्टास, अलगिरदास. ""इंटरनेट कायदयासमोरील अडचणी आणि सत्यता"" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2008-04-19. 2013-11-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ ""इंटरनेटमधील क्रांती"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ टेम्पलेट, ब्रॅड. ""स्पमचा मूळचा अर्थ शिवीगाळ करणे असा आहे"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ ""इंटरनेट जाहिरातीवरील कार्यरत समूहाचा अहवाल"" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-06-15. 2013-11-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ ब्रीग्ज, रेक्स; होलीस, नाइजल. ""वेबवरील जाहिरात"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  12. ^ जानसेन, बी.जे; मुलेन, टी. ""तंत्राच्या इतिहासाचा मागोवा"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  13. ^ a b ""गुगलने स्वतःच्या जाहिरात प्रणालीची सुरूवात केली"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  14. ^ स्यू,, एरिक (९ एप्रिल २०१३). ""दूरचित्रवाणीवरील जाहिरातींचा जमाना"" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-06-30. 2013-11-19 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: unrecognized language (link)
  15. ^ ""ऑनलाइन मार्केटिंग व्याख्या"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  16. ^ "मोबाईल रीच मेडिआ ॲड इंटरफेस डेफिनेशन" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  17. ^ ""विस्तृत बॅनर्स"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  18. ^ ""टर्म: टेक्स ॲड"" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-07-08. 2013-11-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  19. ^ ""५ टॉप एसइओ चुकांच्या याद्या - मॅट कट्स लिखित"" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-11-05. 2013-11-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  20. ^ ख्रिस्टन्सन,, पी. ""एसएमएम"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: unrecognized language (link)
  21. ^ स्टोरी,, लुईस (२२ ऑक्टोबर २००७). ""नाना प्रकारच्या साईट ची निर्मिती"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: unrecognized language (link)
  22. ^ टॅंग, झूलेई. ""ऑनलाईन जाहिरातींची किंमत प्रत्येक टिचकीमागे ठरविली जाते"" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2014-04-07. 2013-11-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)