Jump to content

डिक्शनरी ऑफ नॅशनल बायोग्राफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ बायोग्राफीज या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ बायोग्राफीज हा ब्रिटनमधून प्रसिद्ध हाणारा या चरित्रकोश आहे. २९१७पर्यंत याचे एकूण साठ खंड प्रकाशित झालेले आहेत. युनायटेड किंग्डममधील गेल्या दोन हजार वर्षांमध्ये होऊन गेलेल्या समाज, शेती, उद्योग, व्यापार, साहित्य, संगीत, नाट्य, शिल्प, चित्र, सर्व प्रकारच्या मानवी कला, आदी क्षेत्रांमधील एक लाख वीस हजारांहून अधिक व्यक्तींची साधार व चिकित्सक चरित्रे या खंडांमध्ये प्रकाशित झालेली आहेत. त्या कोशासाठी आजवर सुमारे दहा हजार तज्ज्ञांनी काम केले आहे.

चेंबर्सच असाच एक चरित्रकोश - Chambers Biographical Dictionary आहे. तिच्या १९९५ सालापर्यंत ५ आवृत्त्या आणि पाचव्या आवृत्तीची तीन पु्नर्मुद्रणे झाली होती. ८० तज्ज्ञांनी संकलित केलेल्या १६०० पानांच्या या कोशात २०,००० प्रसिद्ध लोकांची लघुचरित्रे आहेत.

भारतातही पुण्यातल्या सन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला Who's Who in India नावाचा एक ९०० पानी चरित्रकोश आहे. त्याच्या १९३५ साली प्रसिद्ध झालेल्या आवृत्तीत भारताशी संबंध असलेल्या सुमारे २००० प्रसिद्ध भारतीय आणि इंग्लिश लोकांची लघुचरित्रे आहेत.

मुंबईचा टाइम्स ऑफ इंडिया दरवर्षी Who's Who in India नावाचा ग्रंथ प्रकाशित करत असे.

मराठीत प्राचीन चरित्र कोश, मध्ययुगीन चरित्र कोश आणि अर्वाचीन चरित्र कोश असे कोश आहेत. हे कोश प्रत्येकी सुमारे १२०० पानांचे असून सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी एकट्याने लिहिले आहेत. या तीनही कोशांच्या हिंदी आवृत्याही आहेत.