एस. मल्लिकार्जुनय्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एस. मल्लिकार्जुनय्या (जन्म: जून २६, इ.स. १९३१) हे भारतीय जनता पक्षाचे कर्नाटक राज्यातील नेते आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील तुमकूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी दहाव्या लोकसभेचे उपाध्यक्षपद भूषविले.त्यानंतर त्यांनी इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये तुमकूर मतदारसंघातून विजय मिळवला तर इ.स. १९९६ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांचा पराभव झाला.