एस्कलेटर
Appearance
एस्कलेटर, अर्थात सरकता जिना. एस्कलेटर हे लोकांची वाहतूक करण्याचे एक यांत्रिक साधन आहे. या जिन्याच्या पायऱ्या एकमेकांपासून स्वतंत्र असतात आणि त्यांना जोडणारी साखळी स्वरूप यंत्रणा त्यांना वर किंवा खाली सरकवते आणि प्रत्येक दृश्य पायरीला भूपृष्ठाला समांतर ठेवते, जेणे करून माणसे त्या पायऱ्यांवर उभे राहून वरच्या किंवा खालच्या मजल्यावर जाण्याचा प्रवास साध्य करू शकतात.