एल. अदाईकलराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एल. अदाईकलराज (मे ९,इ.स. १९३६-हयात) हे भारत देशातील तमिळनाडू राज्यातील राजकारणी आहेत. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मनीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील तिरूचिरापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.