एबी आणि सीडी
एबी अणि सीडी हा एक भारतीय मराठी चित्रपट आहे. हा मिलिंद लेले यांनी दिग्दर्शित केला होता व अभयनाद सिंह, अक्षय बर्दापूरकर, अरविंद रेड्डी, कृष्णा पर्सौद आणि पियुष सिंह यांनी निर्मित केला होता. हा चित्रपट १३ मार्च २०२० रोजी प्रदर्शित झाला[१]. हे एक विनोदी नाटक आहे[२]. या चित्रपटात विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे मुख्य भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन एक कॅमियोमध्ये(??) दिसले होते.[३][४]
कथा
[संपादन]एबी आणि सीडीची कथा ७४ वर्षीय चंद्रकांत देशपांडे उर्फ सीडीची असून ते आपल्या दोन मुलांबरोबर राहतात. त्यांची दोनही मुले विवाहित असून त्यांना मुले आहेत. चंद्रकांत देशपांडे यांना सेवानिवृत्त होऊन बरेच दिवस झाले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची पत्नी (नीलिमा कुलकर्णी) यांचे निधन झाल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून त्यांना एकटे पडल्यासारखे वाटत होते. कुटुंबातली तशीच बाहेरची माणसे चंद्रकांत यांचा सतत अपमान करीत असत. हिंदी चित्रपटाचे दिग्गज अमिताभ बच्चन यांचे पत्र मिळाल्यावर त्यांचे आयुष्य एक वेगळेच वळण घेते.ef>"Amitabh Bachchan to star in Marathi film AB ani CD". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-05-10. 2020-06-16 रोजी पाहिले.</ref>. अमिताभ म्हणतात की ते अलाहाबादमधील शाळेत वर्गमित्र होते आणि चंद्रकांत यांना त्यांच्या शिक्षकांचा १००वा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आमंत्रण येते. कुटुंबातील लोक आनंदित होतात, स्वतः देशपांडे चकित होतात.f>Mar 13, Ganesh MatkariGanesh Matkari / Updated:; 2020; Ist, 21:15. "AB ani CD Movie Review". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-06-16 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)</ref>
कास्ट
[संपादन]विक्रम गोखले (चंद्रकांत देशपांडे)
अक्षय टांकसाळे
संगीत
[संपादन]असा हात हाती (मेखला खडीकर)
जीवनाचा सोहळा (देवकी पंडित)
बाह्य साईट
[संपादन]एबी अणि सीडी आयएमडीबीवर
संदर्भ
[संपादन]- ^ Zore, Suyog. "Vikram Gokhale's AB Ani CD gets a release date". Cinestaan. 2020-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-16 रोजी पाहिले.
- ^ "What's 'AB aani CD' all about?". www.sakaltimes.com (इंग्रजी भाषेत). 2020-03-12. 2020-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-16 रोजी पाहिले.
- ^ "Amitabh Bachchan's Marathi Film AB Ani CD Set for Digital Premiere on May 1". News18. 2020-04-22. 2020-06-16 रोजी पाहिले.
- ^ MumbaiApril 22, Press Trust of India; April 23, 2020UPDATED:; Ist, 2020 10:13. "Amitabh Bachchan and Vikram Gokhale's Marathi film AB Aani CD to premiere on OTT on May 1". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-06-16 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)