Jump to content

एन्व्हॉय एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Envoy Air (es); Envoy Air (fr); 엔보이 항공 (ko); Envoy Air (ast); Envoy Air (ca); एन्व्हॉय एर (mr); Envoy Air (de); Envoy Air (pt); Envoy Air (en-gb); انووی ایر (fa); 特使航空 (zh); Envoy Air (it); إنفوي للطيران (ar); エンヴォイ・エア (ja); אנבוי אייר (he); American Eagle Airlines (fi); انفوى للطيران (arz); Envoy Air (pl); Envoy Air (nb); Envoy Air (nl); Envoy (id); Envoy Air (vi); American Eagle Airlines (hy); American Eagle Airlines (uz); Envoy Air (en); Envoy Air (en-ca); Envoy Air (sv); Envoy Air (ru) aerolínea regional estadounidense (es); compagnie aérienne américaine (fr); aerollinia de los Estaos Xuníos d'América (ast); aerolínia (ca); airline based in Texas, United States, former American Eagle Airlines (en); US-amerikanische Regionalfluggesellschaft (de); Empresa aérea dos Estados Unidos (pt); شرکت هواپیمایی آمریکایی (fa); 美国的航空公司 (zh); アメリカの航空会社 (ja); شركة طيران (arz); linia lotnicza ze Stanów Zjednoczonych (pl); חברת תעופה אמריקנית וחברת בת של אמריקן איירליינס (he); luchtvaartmaatschappij uit Verenigde Staten van Amerika (nl); airline based in Texas, United States, former American Eagle Airlines (en); شركة طيران أمريكية (ar); perusahaan penerbangan Amerika Serikat (id) American Eagle Airlines (it); American Eagle Airlines (fr); American Eagle Airlines (en-ca); American Eagle Airlines (sv); American Eagle Airlines (pl); אמריקן איגל איירליינס (he); American Eagle Airlines (nl); American Eagle Airlines (en-gb); अमेरिकन ईगल एरलाइन्स (mr); American Eagle Airlines, Envoy Airlines (de); American Eagle Airlines (pt); Envoy Air Inc., American Eagle operated by Envoy Air, American Eagle Airlines, Envoy Airlines (en); انفوي للطيران (ar); 美鷹航空, 美国鹰航 (zh); American Eagle Airlines (es)
एन्व्हॉय एर 
airline based in Texas, United States, former American Eagle Airlines
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविमान वाहतूक कंपनी
स्थान अमेरिकेची संयुक्त संस्थाने
Street address
  • 4301 Regent Blvd., Irving, TX 75063 (इ.स. २०१४ )
मुख्य कार्यकारी अधिकारी
  • पेद्रो फाब्रेगास
Item operated
मालक संस्था
  • AMR Corporation
  • American Airlines Group
मुख्यालयाचे स्थान
हब
Airline alliance
स्थापना
  • इ.स. १९८४
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अमेरिकन ईगल एरलाइन्स अमेरिकेतील प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकन एरलाइन्सची उपकंपनी आहे. एन्व्हॉय एरने केलेल्या अमेरिकन एरलाइन्ससाठीच्या उड्डाणांसाठीचा कर्मचाऱ्यांचा, देखभालीचा तसेच विमानांचा खर्च अमेरिकन एरलाइन्स उचलते.

या कंपनीचे मुख्यालय अर्विंग, टेक्सास येथे आहे.

टोराँटे पियर्सन विमानतळावर उतरणारे एन्व्हॉय एरचे एम्ब्राएर १७५ प्रकारचे विमान

एन्व्हॉय एर केवळ एम्ब्राएर बनावटीच्या प्रादेशिक जेट विमानांचा ताफा चालवते. या कंपनीत १८,००० हून अधिक कर्मचारी असून, ही कंपनी अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, कॅरिबियन आणि दक्षिण अमेरिकेतील १५० हून अधिक गंतव्यस्थानांसाठी दररोज १,००० पेक्षा जास्त उड्डाणे करते. []

इतिहास

[संपादन]
अमेरिकन ईगलचे साब ३४० प्रकारचे विमान २००७मध्ये लॉस एंजेलस विमानतळावर

एन्व्हॉय एर पूर्वी अमेरिकन ईगल एरलाइन्स या नावाने ओळखली जात असे. अमेरिकन एरलाइन्सच्या मूळ कंपनीने आपल्या समूहाच्या मालकीच्या आणि प्रादेशिक उड्डाणे करणाऱ्या अनेक लहान विमान कंपन्यांचे विलीनीकरण करून ही कंपनी स्थापन केली होती. [] अमेरिकन ईगल या ब्रँड अंतर्गत काम करणाऱ्या इतर प्रादेशिक विमान कंपन्यांशी गल्लत होऊ नये म्हणून या कंपनीचे नाव बदलून एन्व्हॉय एर करण्यात आले. []

"अमेरिकन ईगल एरलाइन्स" हे नाव यापूर्वी एप्रिल १९८० ते एप्रिल १९८१ दरम्यान एका वेगळ्या भाड्याने विमाने देणाऱ्या कंपनीने वापरले होते. त्या कंपनीचा एन्व्हॉय एरशी कोणताही संबंध नव्हता. त्या कंपनीने आपली नियोजित उड्डाणे सुरू करण्यापूर्वीच कामकाज स्थगित केले होते आणि दिवाळखोरी जाहीर केली होती. []

माजी उपकंपन्या आणि विलीनीकरण

[संपादन]

एन्व्हॉय एर अनेक छोट्या प्रादेशिक कंपन्या या ना त्या प्रकारे एकत्र होउन झालेली कंपनी आहे.[]

अमेरिकन ईगलच्या उपकंपन्या
कंपनीअमेरिकन ईगलसाठी सेवा सुरूएएमआरने ताब्यात घेतलेअमेरिकन ईगल सेवा संपलीनोंदी
मेट्रोफ्लाईट एरलाइन्स१ नोव्हेंबर, १९८४२८ मे, १९९३२८ मे, १९९३दिवाळखोरी; मालमत्ता सिमन्स एरलाइन्सने विकत घेतली.
एव्ही-एर (पूर्वीची एर व्हर्जिनिया)१५ मे, १९८५मे १९८८मे १९८८दिवाळखोरी; मालमत्ता नॅशव्हिल ईगलने विकत घेतली.
सिमन्स एरलाइन्स१ ऑक्टोबर, १९८५१ ऑगस्ट, १९८७१५ मे, १९९८फ्लॅगशिप आणि विंग्ज वेस्टसह विलीन होऊन अमेरिकन ईगल एरलाइन्स तयार झाली.
कमांड एरवेझ२७ एप्रिल, १९८६२८ सप्टेंबर, १९८८१ जून, १९९१नॅशव्हिल ईगलमध्ये विलीन होऊन फ्लॅगशिप एरलाइन्स तयार झाली.
विंग्ज वेस्टजून १९८६९ ऑगस्ट, १९८७१५ मे, १९९८सिमन्स एरलाइन्समध्ये विलीन होऊन अमेरिकन ईगल एरलाइन्स, इंक. बनली.
एक्झिक्युटिव्ह एरलाइन्स१ नोव्हेंबर, १९८६१९९०३१ मार्च, २०१३सान हुआन (SJU) हब बंद करण्यात आले आणि एटीआर-७२ विमाने ताफ्यातून निवृत्त झाली. []
नॅशव्हिल ईगलजानेवारी १९८८जानेवारी १९८८१ जून, १९९१एएमआर कॉर्पची पहिली स्टार्टअप एरलाइन. कमांड एरवेझमध्ये विलीन होऊन फ्लॅगशिप एरलाइन्स तयार झाली.
फ्लॅगशिप एरलाइन्स१ जून, १९९११ जून, १९९११५ मे, १९९८नॅशव्हिल ईगल आणि कमांड एरवेझच्या विलीनीकरणातून तयार; नंतर सिमन्समध्ये विलीन.
अमेरिकन ईगल एरलाइन्स१५ मे, १९९८१५ मे, १९९८१५ एप्रिल, २०१४विंग्ज वेस्ट, फ्लॅगशिप आणि सिमन्स यांच्या एकत्रीकरणातून स्थापना.
एन्व्हॉय एर१५ एप्रिल, २०१४१५ मे, १९९८सुरू आहेअमेरिकन ईगल एरलाइन्सचे एन्व्हॉय असे पुनर्नामकरण झाले. []
बिझनेस एक्सप्रेस एरलाइन्समार्च १९९९अमेरिकन ईगल ब्रँडखाली कधीही उड्डाण केले नाही; थेट अमेरिकन ईगल एरलाइन्समध्ये विलीन. []

मुख्यालय

[संपादन]
४३०१ रीजंट बुलेव्हार्ड येथील एन्व्हॉय एरचे मुख्यालय

एन्व्हॉय एरचे मुख्यालय टेक्सासच्या अर्व्हिंग शहरात असलेल्या डॅलस-फोर्ट वर्थ विमानतळाच्या उत्तरेस आहे. [] [१०]

एन्व्हॉय एरचे तीन प्रमुख तळ आहेत.[११] [१२]

एन्व्हॉय एरचे तळ
क्र.विमानतळदैनंदिन उड्डाणे
डॅलास/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ, टेक्सास२१०
शिकागो–ओ'हेर, इलिनॉय१३८
मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ, फ्लोरिडा७२

देखभाल तळ

[संपादन]

एन्व्हॉय एरची देखभाल केंद्रे विमानांची दुरुस्ती आणि देखभाल करतात.[१३]

अ.क्र.शहर/राज्यविमानतळदेखभाल प्रकारकर्मचारी संख्या (अंदाजे)मुख्य दुरुस्ती क्षमता (विमान प्रकार)नोंदी
अॅबिलीन, टेक्सासअॅबिलीन प्रादेशिक विमानतळमुख्य देखभाल तळ४००+एम्ब्राएर ई१७०-१७५, ईआरजे १४५सर्वात मोठे आणि जुने केंद्र; किचकट आणि वेळखाऊ दुरुस्ती येथे होते.
शिकागो, इलिनॉयओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळनेहमीची२००+एम्ब्राएर ई१७५तातडीची दुरुस्ती येथे केली जाते.
डॅलस-फोर्ट वर्थ, टेक्सासडॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळनेहमीची३५०+सर्व एम्ब्राएर मॉडेल्सकंपनीचे मुख्यालय आणि सर्वात व्यस्त नेहमीचा देखभाल तळ.
मायामी, फ्लोरिडामायामी आंतरराष्ट्रीय विमानतळनेहमीची१५०+एम्ब्राएर ई१७५दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन उड्डाणांसाठीचे प्रमुख केंद्र.
फिनिक्स, ॲरिझोनाफिनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळप्रादेशिक देखभाल तळ८०+एम्ब्राएर ई१७५पश्चिमेकडे व्यस्त विमानांसाठी २०२२ मध्ये सुरू केला गेला. [१४]
स्प्रिंगफील्ड, मिसूरीस्प्रिंगफील्ड-ब्रॅन्सन विमानतळजड आणि किचकट१००+एम्ब्राएर ई१७५विमानांची इंजिन आणि पायाभूत कामे येथे होतात.
लिटल रॉक, आर्कान्सालिटल रॉक नॅशनल विमानतळदेखभाल तळ७०+एम्ब्राएर ईआरेज १४५प्रामुख्याने ईआरजे मालिकेच्या देखभालीसाठी वापरले जाते.

टीप:

  • नेहमीची देखभाल (Line Maintenance): उड्डाणांच्या दरम्यान केली जाणारी दैनंदिन तपासणी.
  • मुख्य देखभाल (Base/Heavy Maintenance): विमानाचे सुटे भाग खोलून केली जाणारी सखोल तपासणी.

विमान कर्मचारी तळ

[संपादन]

एन्व्हॉय एर आपल्या कर्मचारी आणि वैमानिकांसाठी अमेरिकेतील विविध प्रमुख विमानतळांवर तळ राखते. [१५]

शहर/राज्यविमानतळसेवारतसंदर्भ
शिकागो, इलिनॉयओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळसक्रिय[१६]
डॅलास-फोर्ट वर्थ, टेक्ससडालास/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळसक्रिय[१७]
मायामी, फ्लोरिडामायामी आंतरराष्ट्रीय विमानतळसक्रिय[१८]
फिनिक्स, ॲरिझोनाफिनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळसक्रिय[१९]
न्यू यॉर्क, न्यू यॉर्कलग्वार्डिया विमानतळ / जेएफकेबंद[२०]
बॉस्टन, मॅसॅच्युसेट्सलोगन आंतरराष्ट्रीय विमानतळबंद
लॉस एंजेलस, कॅलिफोर्नियालॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळबंद
नॅशव्हिल, टेनेसीनॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळबंद
रॅले/डरहम, नॉर्थ कॅरोलिनारॅले-डरहम आंतरराष्ट्रीय विमानतळबंद
सान हुआन, पोर्तो रिकोलुई मुनोझ मारिन आंतरराष्ट्रीय विमानतळबंद

विमान ताफा आणि तांत्रिक तपशील

[संपादन]

एन्व्हॉय एर ही जगातील एम्ब्राएर विमानांच्या सर्वात मोठ्या चालकांपैकी एक आहे. या विमानांचा वापर प्रामुख्याने मध्यम पल्ल्याच्या प्रादेशिक उड्डाणांसाठी केला जातो.[२१]

विमान प्रकारसेवारतप्रवासी क्षमताइंजिन प्रकारकमाल वेगनोंदी
एम्ब्राएर १७०६५२ × जीई सीएफ ३४-८ई८७० किमी/तासदोन वर्गांत आसन व्यवस्था
एम्ब्राएर १७५११०+७६२ × जीई सीएफ ३४-८ई८७० किमी/तासप्रथम वर्ग आणि इकॉनॉमी[२२]
एम्ब्राएर ईआरजे १४५१५५०२ × रोल्स-रॉईस एई ३००७८३३ किमी/तासटप्प्याटप्प्याने निवृत्त केली जात आहेत

पूर्वीचा टर्बोप्रॉप विमानताफा

[संपादन]

एन्व्हॉय एरची पूर्वसूरी असलेल्या अमेरिकन ईगल ब्रँडने गेल्या अनेक वर्षांत त्यांच्या विविध प्रादेशिक आणि कम्युटर एरलाइन भागीदारांद्वारे विविध प्रकारच्या जुळ्या टर्बोप्रॉप विमानांचा वापर केला होता. या ताफ्यात प्रामुख्याने खालील विमानांचा समावेश होता:

ताफ्यातील महत्त्वाच्या बदलांची कालरेखा

[संपादन]
वर्षबदल
सप्टेंबर २००९ एएमआर कॉर्पोरेशनने त्यांच्या २५ बॉम्बार्डिये सीआरजे ७०० प्रादेशिक जेट विमानांच्या ताफ्यात प्रथम वर्ग घातले.[२६]
जानेवारी २०१४ एन्व्हॉयला ४० नवीन एम्ब्राएर १७५ विमाने देण्यात आली. ही विमाने कंपनीकडे १३ नोव्हेंबर २०१५ पासून येऊ लागली. [२७]
ऑक्टोबर २०१६ एन्व्हॉयने त्यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एम्ब्राएर १७५ विमाने दाखल झाल्याची घोषणा केली.
मे २०१८ एन्व्हॉयने मार्च आणि नोव्हेंबर २०१९ दरम्यान १५ अतिरिक्त एम्ब्राएर १७५ विमाने घेण्याचे जाहीर केले. २०१९ च्या अखेरीस या विमानांची एकूण संख्या ६९ झाली. [२८]
नोव्हेंबर २०१८ आणखी १५ एम्ब्राएर १७५ विमाने घेण्याचे निश्चित झाले, ज्यामुळे २०२० च्या मध्यापर्यंत ताफ्यातील या विमानांची संख्या ८४ वर पोहोचली.
डिसेंबर २०१९ एन्व्हॉयने आपली उरलेली सर्व बॉम्बार्डिये सीआरजे ७०० विमाने पीएसए एरलाइन्सकडे हस्तांतरित केली.
मार्च २०२० कंपास एरलाइन्स बंद झाल्यानंतर त्यांची २० एम्ब्राएर १७५ विमाने एन्व्हॉयच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली.
फेब्रुवारी २०२१ एन्व्हॉयने त्यांचा ईआरजे १४० विमानांचा ताफा ५ मे २०२१ रोजी कायमचा निवृत्त केला. [२९]
मार्च २०२१ एन्व्हॉयने ६ एम्ब्राएर १७० जेट विमानांची ऑर्डर दिली. [३०]
जून २०२३ पॅरिस एर शो मध्ये अमेरिकन एरलाइन्स ग्रुपने एन्व्हॉयसाठी ७ नवीन एम्ब्राएर १७५ जेट विमानांची ऑर्डर दिली.

आसन आराखडा

[संपादन]
अमेरिकन ईगलचे कॉन्व्हेर ५८०

एन्व्हॉय एरच्या विमानांची अंतर्गत रचना प्रवाशांच्या सोयीसाठी २-२ किंवा १-२ अशा स्वरूपाची असते. यामुळे या विमानांमध्ये कोणालाही मधल्या जागेत बसावे लागत नाही.

एम्ब्राएर १७५ (७६ आसनी)

[संपादन]

हे कंपनीचे सर्वात आधुनिक विमान आहे. यात दोन वर्ग असतात:

  • एकूण जागा: ७६
  • प्रथम वर्ग : १२ जागा (रचना: १-२)
  • मेन केबिन इकॉनॉमी : ६४ जागा (रचना: २-२)

एम्ब्राएर ईआरजे १४५ (५० आसनी)

[संपादन]

हे विमान लहान अंतरासाठी वापरले जाते. यात सर्व जागा इकॉनॉमी वर्गाच्या असतात:

  • एकूण जागा: ५०
  • श्रेणी: इकॉनॉमी
  • रचना: (रचना: १-२)

आसन रचनेचा तुलनात्मक तक्ता

[संपादन]
आसन व्यवस्था तुलना
वैशिष्ट्यएम्ब्राएर १७५एम्ब्राएर १४५
प्रथम वर्ग१२ जागानाही
मेन केबिन६४ जागा५० जागा
मधली खुर्चीनाहीनाही
वाय-फायउपलब्धमर्यादित विमानांत
चार्जिंगची सोयप्रत्येक सीटलानाही

टीप: अमेरिकन एरलाइन्सच्या ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या विशिष्ट फेरीचा अद्ययावत आराखडा पाहू शकता. [३१]

वैशिष्ट्ये

[संपादन]
  • वाय-फाय (Wi-Fi): बहुतांश विमानांमध्ये प्रवाशांसाठी गो-गो इन-फ्लाइट इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.
  • आसन व्यवस्था: सहसा प्रथम वर्ग सामान्य (मेन केबिन) अशा स्वरूपाची आसन रचना असते. मधली सीट नसते.
  • इंधन कार्यक्षमता: ई-जेट मालिका ही तिच्या वर्गातील सर्वात कमी इंधन वापरणारी आणि पर्यावरणपूरक मालिका मानली जाते.

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "About Us - Envoy Air". एन्व्हॉयएर.कॉम. 2014-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  2. "American Eagle - American Airlines". एए.कॉम. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  3. "American Eagle Airlines Inc. Changes Name To Envoy Air Inc". न्यूझ.एए.कॉम. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. Tom W Norwood (1996). "1980". Deregulation Knockouts, Round One. Airways. p. 33. ISBN 0-9653993-0-3.
  5. "Envoy Air History". envoyair.com. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. "Executive Airlines to cease operations". flightglobal.com. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  7. "Name Change to Envoy Air". न्यूझ.एए.कॉम. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  8. "American Eagle Air buying Business Express". द न्यू यॉर्क टाइम्स. December 5, 1998.
  9. Home page Archived May 12, 2014, at the वेबॅक मशीन.. Envoy Air. Retrieved on January 8, 2017. "4301 Regent Boulevard Irving, TX 75063"
  10. Maxon, Terry (2014-04-09). "American Eagle to move 600+ employees into Irving offices in summer 2014". The Dallas Morning News. 2014-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-08 रोजी पाहिले.
  11. "About Us - Envoy Air". एन्व्हॉयएर.कॉम. एन्व्हॉय एर, इंक. २०१४-०५-१२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  12. "American Airlines Newsroom - Envoy Air". news.aa.com. American Airlines. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  13. "Maintenance Operations and Facilities". envoyair.com. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  14. envoyair.com https://www.envoyair.com/2022/09/07/envoy-to-open-phoenix-crew-and-maintenance-base/. २०२६-०२-१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. "About Envoy Air". envoyair.com. 2014-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  16. "American Airlines Group". एए.कॉम. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  17. Maxon, Terry (२०१४-१०-०३). "American Airlines Envoy Air operations". Dallas News. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  18. "Envoy to Re-Open a Crew Base in Miami". Aviation Tribune. २०१७-०५-२३. 2021-04-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  19. "Envoy to open Phoenix Crew and Maintenance Base". envoyair.com. सप्टेंबर ७, २०२२. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  20. Rucinski, Tracy (२०२०-०९-१०). "American Airline's Envoy to close New York City bases". Reuters. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  21. "Envoy Air Fleet Details". एन्व्हॉयएर.कॉम. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  22. "Embraer E175 Specifications". एम्ब्राएर.कॉम. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  23. "Envoy Air History". Envoy Air. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  24. "Fairchild Swearingen Metroliner Data". Airliners.net. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  25. "The Saab 340: A regional success story". Saab AB. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  26. "AMR Corporation Takes Significant Steps to Face Near-Term Challenges". American Airlines Newsroom. 2009-09-17. 2014-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  27. "New Eagle pilots contract would increase flying options but freeze pay". star-telegram.com. 2014-01-15. रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-02-02. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  28. "American Airlines makes two jet purchases valued at more than $1.4B". 2018-05-03. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-08-09. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  29. "Texas's Envoy Air to retire E140s in mid-2Q21". ch-aviation. रोजी मूळ पानापासून संग्रहित2021-02-13. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  30. "Six more birds are coming to Envoy". 2023-03-14. रोजी मूळ पानापासून संग्रहित2023-05-11. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  31. "American Airlines Plane Profiles". aa.com. २०२६-०२-१९ रोजी पाहिले.
  32. NTSB Safety Recommendation July 10, 2006. Addressed to Honorable Marion Blakey, Commissioner, Federal Aviation Administration, pp. 1-4. Retrieved February 15, 2009.
  33. "NTSB Identification: LAX06IA076". ntsb.gov. National Transportation Safety Board. January 2, 2006. LAX06IA076. July 26, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-10-14 रोजी पाहिले.
  34. "Safety Recommendation" (PDF). Federal Aviation Administration. National Transportation Safety Board. pp. 1–4. February 10, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 2009-02-15 रोजी पाहिले.
  35. "Investigation: 200402415 - Saab Aircraft Co SF-340A, VH-KEQ". atsb.gov.au. Australian Transport Safety Bureau. October 21, 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-10-14 रोजी पाहिले.
  36. Ranter, Harro. "ASN Aircraft accident Embraer EMB-145LR (ERJ-145LR) N619AE Chicago-O'Hare International Airport, IL (ORD)". aviation-safety.net. Aviation Safety Network. July 25, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-05-06 रोजी पाहिले.
  37. "Montgomery, Alabama, airport worker dies on ramp in incident involving American Airlines regional jet". CNN. 2023-01-02 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-01-02 रोजी पाहिले.