एड्सगर डिक्स्ट्रा
Jump to navigation
Jump to search
एड्सगर डिक्स्ट्रा (मे ११, इ.स. १९३० - ऑगस्ट ६, इ.स. २००२) हे डच संगणकशास्त्रज्ञ आहेत. प्रोग्रॅमिंग भाषांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना १९७२ मध्ये ट्युरींग पुरस्कार मिळाला होता. संयुक्त संस्थानातील ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठात १९८४ ते २००० पर्यंत ते संगणकशास्त्रात श्लंबर्गर शतकी अध्यासनावरील अध्यापक होते. इ.स. २००२ मध्ये त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांना वितरित संगणकशास्त्रातील स्वसंतुलन प्रणालीसाठी ए.सी.एम. प्रभावशाली संशोधननिबंध पुरस्कार मिळाला. या पुरस्काराला नंतर त्यांच्या स्मरणार्थ डिक्स्ट्रा पुरस्कार असे नाव देण्यात आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |