Jump to content

एडमंड हिलरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडमंड हिलरी

सर एडमंड हिलरी (२० जुलै १९१९जानेवारी ११ २००८) हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३०ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली.

एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरिक्त त्यांनी स्नो-कॅटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण केले, उत्तर ध्रुव पादाक्रांत केला आणि जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला.

त्यांनी हिमालयातील साहसमोहिमांबरोबर तेथील लोकांसाठी अनेक कल्यणकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी हयांचे भारताशी आणि भारतीयांशी अतूट नातेदेखील जोडले आहे. त्यांनी काही काळ भारतात 'हायकमिशनर' ह्या पदावर काम केले आहे.

तारुण्य

[संपादन]

त्यांचा जन्म २० जुलै १९१९ रोजी न्यू झीलंडमधील ऑकलंड शहरात झाला. त्यांचे शिक्षण ऑकलंड ग्रामर स्कूलमध्ये झाले. त्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास दोन तासाच होता त्या वेळात त्यांनी पुस्तके वाचायचा छंद जोपासला. शाळेत असताना ते त्यांच्या वर्गातील इतर मुलांपेक्षा किरकोळ शरीरयष्टीचे होते परंतु वयाबरोबर बनत गेलेला त्यांचा मजबूत बांधा आणि कष्ट झेलण्याची क्षमता त्यांना पुढे उपयोगी पडली. ते शाळेत असताना अबोल आणि स्वप्नाळू होते परंतु पुढील आयुष्यात त्यांनी त्यांच्या साहसावर जगभर व्याख्याने दिली.
१६ वर्षाचे असताना Ruapehuच्या सहलीच्यावेळी त्यांच्यात गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.

मोहिमा

[संपादन]

गौरव

[संपादन]

समाजकार्य

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]