एच.टी.सी. वाईव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एच.टी.सी. वाइव्ह हा एक उच्च दर्जाचा आभासी-वास्तव (व्हर्चुअल रिॲलिटी) हेड सेट आहे. एच.टी.सी. आणि वाल्व कॉर्पोरेशनने ५ एप्रिल २०१६ रोजी हा बाजारात विकायला आणला. हा हेड सेट रूम स्केल तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आले आहे ज्यामध्ये खोलीचे त्रिआयामी आभासी जगात रुपांतर केले जाते. विविध सेन्सर्स आणि हातात असलेल्या कंट्रोलरच्या सहाय्याने आभासी जगातील गोष्टींशी परस्परसंवाद साधला जातो.[१] एच.टी.सी. च्या मार्च २०१५च्या जागतिक मोबाईल काँग्रेसच्या भाषणात प्रकाशित केल्यापासून एच.टी.सी. वाईव ने सी.इ.एस. २०१६ मध्ये २२ पुरस्कार मिळवले आहेत ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट सी.इ.एस. चा पुरस्कार सुद्धा आहे.

विकास[संपादन]

वाल्व निर्मित आभासी वास्तव प्रणालीचे नमुने २०१४ मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. २३ फेब्रुवारी २०१५ ला वाल्व ने २०१५ च्या गेम डेवलपर्स कॉन्फरन्स मध्ये ‘स्टीम वी.आर हार्डवेअर प्रणाली’ चे प्रदर्शन करणार असल्याची घोषणा केली. [२] एच.टी.सी. ने अधिकृतपणे त्यांचे उपकरण ‘वाईव’, त्यांच्या १ मार्च २०१५च्या जागतिक मोबाईल काँग्रेसच्या भाषणात प्रदर्शित केले. २९ फेब्रुवारी २०१६ला सकाळी १० वाजेपासून त्याच्या प्री-ऑर्डर घ्यायला सुरुवात झाली.[३] एच.टी.सी. आणि वाल्व ने घोषणा केली आहे कि काही निवडक डेवलपर्सना हेडसेट मोफत देण्यात येतील.[४] कन्झ्युमर इलेक्ट्रोनिक्स शो २०१६ मध्ये एच.टी.सी. आणि वाल्वने वाईवला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्याचीच एक पूर्व आवृत्ती ‘एच.टी.सी. वाईव प्री’ प्रदर्शित केली.[५] स्टीम व्हीआर, युनिटी प्लॅटफॉर्मला नेटिव सपोर्ट देईल.[६] वाईव ची पुढची आवृत्ती जिचे सांकेतिक नाव वाईव २- ओआसीस आहे, निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याची गेब नेवेल यांनी पुष्टी केली आहे. वाईव २ मध्ये छोटे पण अधिक प्रभावी लाईटहाउसेस, नवीन कंट्रोलर, विशिष्ट्य डिस्प्ले तंत्रज्ञान आणि लहान व हलका वायरलेस हेडसेट असणार आहे.

इतिहास[संपादन]

२०१५च्या मुख्य भाषणात फिल चेन, एच.टी.सी.चे मुख्य विषय अधिकारी तसेच एच.टी.सी. वाईव चे संस्थापक यांनी सांगितले कि, त्यांच्या मनात व्हीआर ची कल्पना आली, अनपेक्षितपणे एच.टी.सी. ला वाल्व मिळाली आणि त्यांनी वाईवची निर्मिती केली चेन यांनी हेही सांगितले कि एच.टी.सी. आणि वाल्वमध्ये जबाबदारीचे स्पष्ट असे वाटप झालेले नसून, एच.टी.सी. मुख्यतः संशोधन आणि विकास विभागाची जबाबदारी सांभाळत आहे.[७] नोव्हेंबर २०१६मध्ये एच.टी.सी. ने टीपीकास्ट निर्मित टीदरलेस व्हीआर अपग्रेड कीट ची घोषणा केली. सीइएस २०१७मध्ये याच्या पब्लिक मॉडेलची घोषणा करण्यात आली ज्याची किंमत $२४९ होती. २०१७ला गूगल आय.ओ. मध्ये, गूगलने आल इन-बिल्ट ‘स्टँडअलोन व्हीआर’ प्रणालीची घोषणा केली, जी वाईवची टीम आणि लेनेवोच्या सहकार्याने बनवली जाईल.[८]

तांत्रिक वैशिष्ट्ये[संपादन]

वाईवला ९० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे. या उपकरणाला एका डोळ्यासाठी एक याप्रमाणे १०८० x १२०० चे रिझोल्यूशन असलेल्या दोन स्क्रीन्स आहेत.[९] या उपकरणात ७० पेक्षा जास्त सेन्सर्सचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये एमइएमएस गायरोस्कोप, एक्सेलेरोमीटर आणि लेसर पोसिशन सेन्सर्सचा समावेश आहे. त्याची लाईटहाउस सिस्टीमची रचना ॲलन येत्स याने केली आहे आणि ती ज्या ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे त्याच्यावर लावलेल्या सामान्य फोटोसेन्सर्सचा वापर करते. कुठल्याही प्रकारची धडक बसू नये म्हणून हि प्रणाली दुसऱ्या दोन लाईटहाउस स्टेशन्स बरोबर वापरण्यात आली आहे.

समोर असलेल्या कॅमेऱ्यामुळे रूममध्ये असलेल्या स्थिर किंवा हलणाऱ्या वस्तू ओळखण्यास मदत होते. यामुळे व्यक्तीला कुठल्याही अडथळ्यापासून वाचवण्यासाठी कॅमेऱ्याच्या फीड डिस्प्लेवर दाखवली जाते.[१०] वाईवला सुरुवातीला मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणाऱ्या संगणकांची आवश्यकता होती. जून २०१७मध्ये एच.टी.सी. आणि वाल्वने, वाईव आणि स्टीम व्हीआर मॅक ओएस वर चालणाऱ्या संगणकांसाठी आणण्याचे घोषित केले.[११]

गेम्स[संपादन]

मार्च २०१६पर्यंत, जेव्हा एच.टी.सी. वाईवच्या प्री-ऑर्डर्सला सुरुवात झाली होती तेव्हा आभासी-वास्तव प्रकारामध्ये १०७ गेम्स बाजारात येण्यासाठी तयार होते.[१२] रेव्हाइव नावाचा ओपन सोर्स प्रोग्राम वापरून ओकुलस रीफ्टचे गेम्स एच.टी.सी. वाईवसाठी वापरता येतात.

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Valve's VR headset is called the Vive and it's made by HTC". theverge.com. 1 Mar 2015. 
 2. ^ "Valve is making a VR headset and its own Steam Machine". engadget.com. 23 Feb 2015. 
 3. ^ "HTC Vive pre-orders to start on February 29". telegraph.co.uk. 11 Jan 2016. 
 4. ^ "Art historian BN Goswamy brings painter Nainsukh to Bangalore". in.pcmag.com. 7 April 2016. 
 5. ^ "HTC Vive Pre impressions: A great VR system has only gotten better". arstechnica.com. 28 January 2016. 
 6. ^ "Valve Is Bringing Native Unity Support To SteamVR". uploadvr.com. 11 February 2016. 
 7. ^ "MTBS-TV: Conversing With Phil Chen, Chief Content Officer, HTC". youtube.com. 8 October 2015. 
 8. ^ "Google Announces Standalone Headset to be Made by HTC and Lenovo". vrfocus.com. 21 May 2017. 
 9. ^ "Valve and HTC Reveal Vive VR Headset". gamespot.com. 2 March 2015. 
 10. ^ "HTC: Why Vive Will Beat Oculus VR at Its Own Game". tomsguide.com. 17 Jul 2015. 
 11. ^ "SteamVR is coming to Mac—and Apple says it will actually work". arstechnica.com. 6 May 2017. 
 12. ^ "124 games revealed ahead of HTC Vive pre-order launch". finder.com.au. 29 February 2016.