एचएमएस अजॅक्स
Appearance
(एच.एम.एस. अजॅक्स (निःसंदिग्धीकरण) या पानावरून पुनर्निर्देशित)
एच.एम.एस. अजॅक्स या नावाने सुरू होणाऱ्या रॉयल नेव्हीच्या अनेक लढाऊ नौका होत्या.
- एच.एम.एस. अजॅक्स (१७६७) - १७६७मध्ये बांधलेली आणि १७८५ मध्ये विकून टाकलेली ७४ तोफा असलेली तिसऱ्या दर्जाची लढाऊ नौका.
- एच.एम.एस. अजॅक्स (१७९८) - १७९८मध्ये बांधलेली ७४ तोफा असलेली तिसऱ्या दर्जाची लढाऊ नौका. हीने ट्राफालगारच्या लढाईत भाग घेतला होता. १८०५मध्ये जळितात नष्ट.
- एच.एम.एस. अजॅक्स (१८०९) - १८०९मध्ये बांधलेली आणि १८६४ मध्ये मोडीत काढलेली ७४ तोफा असलेली तिसऱ्या दर्जाची लढाऊ नौका. १८४६मध्ये हीस यांत्रिक चलनवलन बसविण्यात आले.
- एच.एम.एस. अजॅक्स (१८३५) - १८६७मध्ये एच.एम.एस. व्हॅंगार्ड नावाने बांधलेली ७८ तोफांची तिसऱ्या दर्जाची लढाऊ नौका. १८६७मध्ये हीचे पुनर्नामकरण एच.एम.एस. अजॅक्स केले गेले आणि १८७५मध्ये मोडीत काढली गेली.
- एच.एम.एस. अजॅक्स (१८८०) - १८८०मध्ये बांधलेली व १९०४मध्ये विकून टाकलेली लोहवेष्टित युद्धनौका.
- एच.एम.एस. अजॅक्स (१९१२) - १९१२मध्ये बांधलेली व १९२६मध्ये मोडीत काढलेली किंग जॉर्ज ५ वर्गाची युद्धनौका.
- एच.एम.एस. अजॅक्स (२२) - १९३४मध्ये बांधलेली व १९४९मध्ये मोडीत काढलेली लियॅंडर वर्गाची क्रुझर. हीने रिव्हर प्लेटच्या लढाईत भाग घेतला होता.
- एच.एम.एस. अजॅक्स (एफ११४) - १९६२मध्ये बांधलेली व १९८८मध्ये मोडीत काढलेली लियॅंडर वर्गाची फ्रिगेट.
- एच.एम.एस. अजॅक्स (एस१२५) - ॲस्ट्यूट वर्गाची सातवी आयोजित पाणबुडी.