एच-१ बी व्हिसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एच-१ बी व्हिसा हा अमेरिकेमध्ये दाखल होण्यासाठीचा एक प्रकारचा व्हिसा आहे. हा व्हिसा इमिग्रेशन अँड नॅशनालिटी ॲक्टच्या कलम १०१ (ए)(१५)-(एच)नुसार दिला जातो. अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक व्हिसांपैकी हा एक आहे.

हा व्हिसा परदेशी लोकांनी अमेरिकेत ठराविक मुदतीसाठी ये-जा करण्यासाठी तसेच पगारी काम करण्यासाठी देण्यात येतो. हा व्हिसा घेउन अमेरिकेत दाखल झाल्यावर ठराविक कंपनीकरता ठराविक मुदतीसाठी ठराविक काम करण्याची मुभा मिळते. हा व्हिसा घेउन काम करणाऱ्याला ठराविक रक्कम (किंवा त्यापेक्षा जास्त) पगार देणे आवश्यक असते. हा व्हिसा सहसा तांत्रिकी, वैद्यकीय व तत्सम व्यवसायरत व्यक्तींना देण्यात येतो. या व्हिसासाठी अर्ज करताना प्रथमतः तीन वर्षांपर्यंतची मुदत मिळू शकते. यानंतर अजून तीन वर्षांच्या मुदतीसाठी अर्ज करता येतो. काही अटींची पूर्तता केल्यास त्यानंतरही एक किंवा दोन वर्षांची मुदतवाढ मागता येते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.