एक्सेंट वॉल
Appearance
एक्सेंट वॉल (किंवा विशिष्ट भिंत ) ही एक अंतर्गत भागातील भिंत आहे ज्याची रचना/ रंग खोलीतील इतर भिंतींपेक्षा वेगळी असते. विशिष्ट भिंतीचा रंग सहसा इतर भिंतींच्या रंगाच्या भिन्न छटेचा असू शकतो, तसेच त्याची बांधकाम सामग्री भिन्न असू शकते.[१]
विशिष्ट भिंत विशेषतः जेव्हा इतर भिंतींच्या नमुन्यापेक्षा वेगळा असतो. अशी विशिष्ट भिंतींवर दोन वेगवेगळ्या छटांनी रंगविला जातो. कधीकधी खोलीमधील इतर भिंतींना वॉलपेपर लावला जातो आणि विशिष्ट भिंत रंगवलेली असू शकते. विशिष्ट भिंतीचा वापर सौंदर्यासाठी किंवा पेंटिंगसारख्या काही सजावटीच्या घटकांवर प्रकाश टाकण्यासाठी केलेला असू शकतो.[२]
हे सुद्धा पहा
[संपादन]- हाऊस पेंटर आणि डेकोरेटर
संदर्भ
[संपादन]- ^ Sennebogen, Emilie (2 June 2010). "Guide to Painting an Accent Wall". HowStuffWorks.com. 11 June 2011 रोजी पाहिले.
- ^ Pollard, Kit. "Just One Wall: When the Accent Wall Works". houzz.com. <http://www.houzz.com/ideabooks/132345/list/Just-One-Wall--When-the-Accent-Wall-Works>