एकात्मता साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एकात्मता साहित्य संंमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

परळी वैजनाथ येथे २७ एप्रिल २०१४ रोजी राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष कवी व कथालेखक राज अहेरराव असतील.

संमेलनाच्या उद्‌घाटक : अश्विनी कुलकर्णी आणि भारती न्यायाधीश

संमेलनात भारतरत्‍न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानतर्फे, १० वल्लभभाई पुरस्कार देण्यात येणार आहेत. ते ज्यांना मिळणार आहेत, त्यांपैकी काही पुरस्कारार्थी : मदन कुलकर्णी, सुधाकर खुडे, सुनील नायकवाडी, सच्चिदानंद बोधले आणि पुरुषोत्तम शेंडे, वगैरे.

  • श्रीपाल सबनीस हे एदलाबादला झालेल्या राष्ट्रीय एकात्मता संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • ८वे राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन २२ फेब्रुवारी, २०१६ रोजी अंदमानमध्ये पोर्ट ब्लेयर येथे होणार आहे.