एअर अस्ताना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एअर अस्ताना
आय.ए.टी.ए.
KC
आय.सी.ए.ओ.
KZR
कॉलसाईन
ASTANALINE
स्थापना २९ ऑगस्ट २००१
उड्डाणांची सुरूवात १५ मे २००२
हब अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अल्माटी)
अस्ताना आंतरराष्ट्रीय विमानतळ (अस्ताना)
अतिरौ
फ्रिक्वेंट फ्लायर फ्लाइंग ब्ल्यू
विमान संख्या ३०
ब्रीदवाक्य From the Heart of Eurasia
मुख्यालय अल्माटी, केनिया
संकेतस्थळ http://www.airastana.com/

एअर अस्ताना ही कझाखस्तानमधील विमानवाहतूक कंपनी आहे. याचे मुख्यालय अल्माटी शहरात आहे.[१] या कंपनीचे मुख्य ठाणे अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ तर इतर ठाणे अस्ताना आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. एर अस्ताना कझखस्तान तसेच इथर देशांतील ६४ शहरांना विमानसेवा पुरविते. या कंपनीची मालकी कझाखस्तान सरकारच्या मालकचा संपत्ती निधी समृक-कझायना (५१%) आणि बी.ए.इ., पीएलसी (४९%) यांचा सयुंक्त उपक्रम आहे.[२] या कंपनीची स्थापना ऑक्टोबर २००१ मध्ये झाली तर १५ मे २००२ पासून व्यावसायिक उड्डाणे सुरु झाली.

इतिहास[संपादन]

एअर अस्ताना हे आशिया पॅसिफिक एव्हिएशनकडून जानेवारी २०१२ मध्ये " पहिल्या दशकात दुसऱ्या नवीन सुरु झालेल्या वाहकापेक्षा चांगल प्रदर्शन करणारे " असे संबोधले गेले. (सी.ए.पि.ए, एअरलाईन एनॅलिसिस, ९ जानेवारी २०१२). त्याचा आरंभ विमान परिवहन क्षेत्रातील सध्याच्या काळातील खुणा आणि असंभव गोष्टी दर्शवितो. सुरवातीला देशांतर्गत विमान परिवहन असताना बी.ए.इ. संस्थेने २००१ मध्ये कझाखस्तानच्या राष्ट्राध्यक्ष नुरुसुल्तान नाझरबायेव्हच्या विनंतीवरून त्याला मान्यता दिली आणि कझाखस्तान सरकारअंतर्गत एअर रडार करार केला. बी.ए.इ. संस्थेचे अध्यक्ष सर रीचर्ड एवंस हे प्रमुख सूत्र होते. रडार करारात कधीही सुधारणा केली गेली नाही. बी.ए.इ. संस्थेतील जेष्ठ व्यवस्थापन बदल आणि स्ट्रॅटिजिक रिव्ह्यूमुळे कझाखस्तानमधील कार्यालय बंद झाले. नाझरबायेव्ह आणि बरेचसे सल्लागार यांचे समर्थन असले तरी, सुरवातीला विदेशी कंपनी असल्यामुळे कझाखस्तानच्या प्रसारमाध्यम आणि राजकीय संस्थेकडून त्याला विरोध केला गेला.

२००२-२००५[संपादन]

या सर्व त्रुटीमुळे परिवहन मंडळाने जबाबदारी काढून घेतली. त्याच्या ब्रिटिश रॉयल एअरवेज अधिकारी लॉयड पॅक्सटॉन या पहिल्या कार्यरत अध्यक्षांतर्गत (इंटरनॅशनल लिस फाइनान्स कॉर्पोरेशन) कडून पहिले ३ बोईंग ७३७ भाडेतत्त्वावर घेतली आणि १५ मे २००२ ला व्यावसायिक कामे सुरु केली गेली. तसेच २००३ मध्ये एअरक्राफ्ट फाइनान्स ट्रेडिंग बी.व्ही. (ए.एफ.टी) फोक्कर ५० एस. आणि पेगासस लिसिंग कॉर्पोरेशनकडून ३ बोइंग ७५७ भाडेतत्त्वावर घेतली गेली. त्याने त्याच्या पहिल्या कार्यरत वर्षात म्हणजे २००३ मध्ये निव्वळ नफा घोषित केला. पूर्वीच्या विमान परिवहन एअर कझाखस्तानच्या फेब्रुवारी २००४ मध्ये झालेल्या कर्जबाजारीपणानंतर, देशांतर्गत मार्ग आंतरराष्ट्रीय मार्गामध्ये दुबई, इस्तंबूल, मॉस्को आणि बीजिंग तसेच फ्रॅंकफर्ट आणि लंडनला विस्तृत केले गेले. [३]

२००५ - आजचा दिवस[संपादन]

फ्लीट प्लॅन्स आणि केंद्रीय धोरणांमधील दुमतामुळे शेअरहोल्डर्स मध्ये तणाव निर्माण झाला. तसेच २००५ मध्ये व्यवस्थापन बदल घडून आले. कॅथे पॅसिफिक विमान परिवहन मंडळाचा कार्यकारी असलेला पीटर फॉस्टरने फिलिपाईन एअरलाईन पुनर्वसन मंडळाचे नेतृत्व केले. पीटर फॉस्टर हा आधी रॉयल ब्रुनेई विमान परिवहन मंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता आणि १ ऑक्टोबर २००५ ला विमान परिवहन मंडळाचा अध्यक्ष म्हणून रुजू झाला, तेव्हापासून बनविलेले विकास योजना आणि व्यवस्थापन रचना अजूनही बदलेले नाहीत. हे विमान परिवहन सातत्याने फायदेशीर ठरले आहे आणि एअर बिझनेस आणि एअर फाइनान्स जर्नल नुसार सर्वोच्च २० फायदेशीर विमान परिवहन मंडळाच्या यादीत क्रमांक पटकावला आहे. २०१५ च्या सर्वेक्षणानुसार ग्लोबल एअरलाइन फायनान्शिअल रेटिंग मध्ये त्याचा २० वा क्रमांक आहे. त्याचे रेटिंग बी.बी.बी. आहे. फायनान्शिअल टाइम्सने बी.ए.ई. संस्थेच्या भरपाई कार्यकमावरी (१०/१०/१३) च्या लेखामध्ये असे लिहिले की कझाखस्तानच्या विमान परिवहन मधील बी.ए.ई. चे ४९% भांडवल हे कंपनीचे सर्वात जास्त नफा देणारी गुंतवणूक आहे.[४]

एअर अस्तानामध्ये ४७०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. नवलाची बाब अशी की जरी कंपनी सरळ त्यांच्या आंतराष्ट्रीय कार्यालयांसाठी कर्मचारी भरती करत असली तरी त्यातील बहुतांश कर्मचारी कझाखस्तानचे रहिवासी आहेत. ८ डिसेंबर २०१६ पर्यंत एअर अस्ताना हे एकुलते एक विमान परिवहन होते ज्याला युरोपियन युनियन्सला उडण्याची परवानगी होती. एअर अस्ताना हे एक्स्पो २०१७ चे अधिकृत एअर कॅरिअर आहे [५]आणि अधिकृत एअर कॅरियर आणि २०१७ विंटर युनिव्हर्सिड़ची भागीदारी २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१७ मध्ये अल्माटी मध्ये होईल.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "हेड ऑफिस".
  2. ^ "एअर अस्ताना आईज पॅरिस ॲंड प्राग सर्विसेस आफ्टर युरोपियन युनियन लिफ्ट्स सेफ्टी बॅन". १५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "एअर अस्ताना एरलाईन्स रूट्स". १५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "ऑफसेट साइड डील्स स्पार्क कॉल्स फॉर ट्रान्सपॅरेंसी". १५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "अस्ताना एक्स्पो २०१७ हज ऍन ऑफिसिअल एअर कॅर्रीयर". १५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: