Jump to content

बर्लिन उ-बाह्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उ-बाह्न या पानावरून पुनर्निर्देशित)
बर्लिन उ-बाह्न
ओबेरबॉमब्रुक पुलावरून जात असलेली उ-बाह्न
स्थान बर्लिन, जर्मनी
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग १०
मार्ग लांबी १५१.७ किमी कि.मी.
एकुण स्थानके १७३
वार्षिक प्रवासी संख्या ५३ कोटी, ४५ लाख (२०१५)
सेवेस आरंभ इ.स. १९०२
संकेतस्थळ www.bvg.de अधिकृत संकेतस्थळ
मार्ग नकाशा

U-Bahn Berlin.png

बर्लिन उ-बाह्न किंवा उंटरग्राउंडबाह्न (भुयारी रेल्वे) ही जर्मनीची राजधानी बर्लिनमधील वाहतूक प्रणाली आहे. यात १० मार्ग असून त्यांवर एकूण १७३ स्थानके आहेत. प्रत्येक मार्गावरून गर्दीच्या वेळी दर २-५ मिनिटांनी तर इतर वेळी दिवसा दर पाच मिनिटांनी आणि रात्रीच्या वेळी दर दहा मिनिटांनी गाड्या धावतात. पहाटे १-४ या वेळात ही प्रणाली बंद असली तरीही त्यावेळी त्याच मार्गांना समांतर बस दर २० मिनिटांनी धावतात. या रात्रबस प्रत्येक उ-बाह्न स्थानकांना जातात. १५७.५ किमी लांबी असलेले हे रेल्वेमार्ग अंदाजे ८०% जमिनीखालून आहेत तर उरलेले जमिनीवर आणि पुलांवरून आहेत. २०१५ साली ५३ कोटी ४५ लाख प्रवाशांनी यातून प्रवास केला होता.

उ-बाह्नचे उद्घाटन १९०२ साली झाले.

मार्ग

[संपादन]
मार्ग सुरुवात/शेवट उद्घाटन लांबी स्थानके रंग
उह्लांडस्ट्रासवारशॉउअरस्ट्रास १९०२-१९२६ ८.८१४ किमी (५.४७७ मैल) १३  
पॅन्काऊरुह्लबेन १९०२-२००० २०.७१६ किमी (१२.८७२ मैल) २९  
नॉलेन्डोर्फप्लाट्झक्रुमे लांक १९१३-१९२९ ११.९४० किमी (७.४१९ मैल) १५  
नॉलेन्डोर्फप्लाट्झइन्सब्रुकरप्लाट्झ १९१० २.८६४ किमी (१.७८० मैल)  
अलेक्झांडरप्लाट्झहोनोऊ १९३०-१९८९ १८.३५६ किमी (११.४०६ मैल) २०  
हॉप्टबाह्नहॉफब्रांडेनबुर्गर टोर २००९ १.४७० किमी (०.९१३ मैल)[]  
आल्ट-टेगेलआल्ट-मेरियेलडोर्फ १९२३-१९६६ १९.८८८ किमी (१२.३५८ मैल) २९  
रॅटहौस स्पॅंडाऊरुडाऊ १९२४-१९८४ ३१.७६० किमी (१९.७३५ मैल) ४०  
विट्टेनाउहेर्मानस्ट्रास १९२७-१९९६ १८.०४२ किमी (११.२११ मैल) २४  
रॅटहौस स्टेग्लित्झओस्लोअरस्ट्रास १९६१-१९७६ १२.५२३ किमी (७.७८१ मैल) १८  

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Pressemitteilung vom 30.08.2005" (जर्मन भाषेत). बीव्हीजी. 2005-08-30. February 25, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-09-21 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)