उषा अकोलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उषा प्रकाश अकोलकर या एक मराठी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या.[ संदर्भ हवा ] ’तुझंच तुला घडायचंय’ हे त्यांच्या विविध आत्मपर लेखांचे संकलन आहे.[ संदर्भ हवा ] त्यांच्या काही कवितांचाही या पुस्तकात समावेश आहे. या पुस्तकाचे काम चालू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्याही आठवणी सांगणारे त्यांच्या सुहृदांचे काही लेखही या पुस्तकात आहेत.

पुरस्कार[संपादन]

  • अकोलकर यांच्या स्मृतिनिमित्त स्नेहसेवा संस्थेतर्फे एक स्मृती पुरस्कार दिला जातो. जयश्री विश्वास काळे यांना जानेवारी २०१८मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी "बुक गंगा डॉट कॉम'चे संस्थापक मंदार जोगळेकर यांना २०१७ साली हा पुरस्कार मिळाला होता.