उलट टी पद्धतीने डोळे भरणे
Appearance
कलम करताना उलट टी पद्धतीने डोळे भरणे (INVERTED T BUDDING) ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असते त्या भागात T पद्धतीने भरलेल्या डोळ्यात पाणी शिरून डोळा कुजण्याचा संभव असतो. अशा परिस्थितीत उलट टी पद्धतीने डोळे भरल्यास कलम जगण्यास मदत होते. लिंबूवर्गीय फळझाडात उलट टी पद्धतीनेही डोळे बांधता येतात.