उर्वशी (वनस्पती)
Jump to navigation
Jump to search
उर्वशी उर्फ केशरी बहावा उर्फ ॲम्हर्स्तिया नोबिलीस (Amherstia nobilis) हे मूळ ब्रह्मदेशातील वनस्पती आहे.
याचे शास्त्रीय नाव ब्रम्हदेशातून हे झाड भारतात आणून लावणाऱ्या लेडी ॲम्हर्स्तियाच्या नावावरुन दिले गेलेले आहे.[१] या झाडाची पाने लालसर, नाजूक आणि लुसलुशीत असतात. कळयांच झुंबर उघडतं तेव्हा त्याची फुले फुलतात. तिची पिवळी छटा इतर पाकळयाहून वेगळीच असते. याची फुले फुलून गेल्यावर लालबुंद रंगाचा डाग पांढऱ्या व गुलाबी रंगाची शेंग दिसते. ही शेंग चार ते पाच इंच लांब असते. त्यात एकच वाटोळी चपटी बी असते. झाडावर तडकून स्प्रिंगसारखी वळणारी हि शेंग तडकण्याआधीच उतरली तरच बी हाती लागते.