उपवने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


उपवने[संपादन]

वनांच्या विविध प्रकारे तयार केलेल्या मानवनिर्मित प्रतिकृति म्हणजे उपवने होत.

वनातला आनंद अनुभवावयास आपणास वेळ नसतो म्हणुन आपण उपवने तयार करतो. उपवने म्हणजे वनाची लहानशी थोडीबहुत सुधारलेली नक्कल. ज्याच्या त्याच्या ऎपतीप्रमाणे ते लहान मोठे करता येते. अर्थातच नुसती ऎपत पुरी पडत नाही.

उपवन उत्तम करावयाचे म्हणजे पुष्कळ बुद्धिमत्ताही जमेला पाहिजे. वनातल्या अडचणी, गैरसोयी, भये, नाहीशी करून जी वनश्रीची रचना होते तिला उपवन म्हणतात.

भातशेती

शेती हीसुद्धा एक उपवनरचनाच आहे. अन्नवस्त्रादिकाकरता उपयोगी असलेली वनश्री संभाळण्याकरता जी व्यवस्था करतात ती शेती होय. अशा शेतीमध्ये आता बरीच भर पडत चालली आहे. आपल्याला फुले पाहिजेत तर फुले पिकवणे हासुद्धा शेतीचा भाग झाला आहे. दुभती जनावरे पाळणे, पक्षी पाळणे हा सुद्धा शेतीचा भाग आहे.

उपवनाचा विस्तार एकाद्या घरातल्या लहानशा बागेपासुन शेकडो एकरांच्या वनसदनापर्यंत असू शकतो. झाडे झुडे तर असावयचीच पण त्याखेरीज पशुपक्षीही असावयाचे, आणि त्यांचे स्वैर व्यवहार माणसाला बिनधोक पहावयास मिळावयाचे, अशी जेथे व्यवस्था केलेली असते अशा वनांना आता अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने म्हणून संरक्षण देण्यात येते. अशी अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने ह्ल्ली सर्व जगभर स्थापन झालेली आहेत. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ संदर्भ: मल्हार विनायक आपटे - " वनश्रीसृष्टी"