उपनगरी रेल्वे
Appearance
(उपनगरीय रेल्वे गाडी या पानावरून पुनर्निर्देशित)
उपनगरी रेल्वे हा प्रवासी रेल्वे वाहतूकीचा एक प्रकार आहे. उपनगरी रेल्वे साधारणपणे मोठ्या शहरांमध्ये व महानगरांमध्ये वापरली जाते व शहराच्या केंद्राला उपनगरांसोबत जोडते. उपनगरी रेल्वे दैनंदिन परिवहनासाठी वापरली जाते. उपनगरी रेल्वेसेवा बव्हंशी वेळा लांब पल्ल्यांच्या रेल्वेमार्गांवरच धावतात व ५० किमीपेक्षा अधिक अंतर काटतात. ह्याउलट मेट्रो रेल्वे किंवा इतर जलद परिवहन सेवा सुमारे १२ ते २० किमी अंतरादरम्यान धावतात.
मुंबई उपनगरी रेल्वे ही आशियामधील सर्वात जुनी उपनगरी रेल्वे सेवा दररोज ७२.४ लाख प्रवाशांची वाहतूक करते.