उद्धव किशनराव भयवाळ
Appearance
(उध्दव किशनराव भयवाळ या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
उद्धव किशनराव भयवाळ (जन्म : बदनापूर-जालना जिल्हा, १८ जून १९५०) हे एक मराठी साहित्यिक आहेत.
शिक्षण व नोकरी
[संपादन]मूळ गावातून १९६६ साली एस.एस.सी झाल्यावर उद्धव भयवाळ जालन्याला आले. तेथे ते जे.ई.एस. कॉलेजमधून फिजिक्स विषय घेऊन बी.एस्सी. झाले. त्यानंतर त्यांनी १९७३-२००६ या काळात स्टेट बँक ऑफ हैद्राबादमध्ये विविध पदांवर काम केले. तेथून २००६ साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर ते लेखनाकडे वळले.
उद्धव किशनराव भयवाळ यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- इंद्रधनुष्य (कवितासंग्रह)
- हसरी फुले (बालकविता संग्रह)
- याशिवाय काही एकांकिका व विनोदी कथा
मिळालेले पुरस्कार व सन्मान
[संपादन]- अंकुर वाङ्मय पुरस्कार (२००८)
- 'नवरत्न' पुरस्कारापैकी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार (दिनांक २५-०२-२०१६ रोजी पंढरपूर येथे)
- साहित्यसेवेबद्दल 'कलाकुंज ‘ प्रकाशनाच्या वतीने साहित्यिक चंद्रकांत महामिने यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै २०१४ रोजी नाशिक येथे सत्कार.
- सुभेद्रा प्रतिष्ठान (सेलू-परभणी जिल्हा) यांच्यातर्फे व दाजी पणशीकर यांच्या हस्ते गौरव पुरस्कार (५ मार्च २०१२)