अगरबत्ती
Appearance
(उदबत्ती या पानावरून पुनर्निर्देशित)
अगरबत्ती किंवा उदबत्ती ही पूजा, धार्मिक विधी व उत्सव यांमध्ये वापरली जाते. ही बराच काळ हळूहळू जळते व सुगंध पसरविते. धूप, ऊद, चंदन, कापूर इत्यादी पदार्थ पुरातन काळापासून जगातील सर्व धर्मातील पूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जातात. अगरबत्ती बनविण्यासाठी ऊद, अगरू इत्यादी पदार्थ वापरीत म्हणून तिला उदबत्ती, अगरबत्ती असे नाव पडले.[१]संध्याकाळी देवापुढे अगरबत्ती लावतात, त्याने मन प्रसन्न व आनंदी राहते.चीन आणि जपानमधील बुद्ध विहारांबाहेर उंच अगरबत्त्या दहा दिवस पेटत ठेवण्याची प्रथा आहे.[२]
पूजा किंवा धार्मिक विधीमध्ये अगरबत्तीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की देवाची पूजा करत असताना आपले मन संपूर्णपणे प्रार्थनेत विलीन व्हावे यासाठी अगरबत्तीच्या मनमोहक सुवासाची मदत होते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ भू.चिं. मिठारी. उदबत्ती. मराठी विश्वकोश (वेब ed.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. 10 सप्टेंबर 2013 रोजी पाहिले.
- ^ राजेश चुरी (५ सप्टेंबर, २०१३). "'उंची' अगरबत्ती!". महाराष्ट्र टाइम्स. मुंबई. 10 सप्टेंबर 2013 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]