हिंदू मिथकनुसार, देवांनी समुद्र मंथनातून मिळवलेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे, उच्चैःश्रवा ("तीक्ष्ण कानांचा") शूभ्रपांढरा, काळ्या शेपटीचा, सात डोकी असलेला उडता घोडा,[१] औटघटकेचे इंद्रपद मिळाले असता राक्षसांचा दानशूर राजा बळी याने हा घोडा इतर रत्नांसोबत मानव लोकात दान केला , इंद्राने वापस आणला; तसेच राक्षस शूंभा-निशुंभांनीसुद्धा तो इंद्राकडून इतर रत्नांसमवेत जिंकून घेतला[२]
उच्चैःश्रवा बहुतेक वेळा सूर्याचे वाहन असे वर्णन केले जाते.[३][४]