Jump to content

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ई.पी.एफ. (गुंतवणूक योजना) या पानावरून पुनर्निर्देशित)



कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) ही १९५२ मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. वीसहून अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी आणि त्याची मालक आस्थापना दरमहा मूळवेतनाच्या बारा टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात. या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ देण्याबरोबरच दोन अतिरिक्त लाभही आहेत.

  • कर्मचारी निवृत्तिवेतन योजना (Employees Pension Scheme)
  • कर्मचारी ठेवीशी निगडित विमा योजना (Employees Deposit Linked Insurance Scheme)

या योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्यास त्याचे या योजनेमध्ये झालेल्या संचित ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात बदल होऊ शकतो.कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्था यावर देखरेख ठेवते.

कर्मचा-यांच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबित व्यक्तीस पेन्शनचा लाभ या योजनेंतर्गत दिला जातो.