ई-पुस्तक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ई-पुस्तक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतर. या प्रकारच्या पुस्तकात मजकूर, चित्रे किंंवा दोन्ही असू शकते, जे संगणक किंवा मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारज वाचले जाते.[१]
जरी याला पुस्तकाचे "डिजीटल रूपांतर" म्हणले जात असले, तरी काही पुस्तके ही फक्त ई-पुस्तके म्हणूनच प्रकाशित केली जातात. ई-पुस्तके ई-बुक रीडर या खास वाचण्यासाठी तयार केलेल्या उपकरणावर वाचली जाऊ शकतात, त्यासोबतच संगणक, टॅब्लेट्स, लॅपटॉप किंंवा मोबाईल फोनद्वारे वाचता येतात.
पुस्तकाची पाने पीडीएफ/किंवा चित्ररूपात न ठेवता ती वेगळ्या प्रकारच्या टंकात साठविली जातात. जेणेकरून वाचक वापरत असलेल्या साधनाच्या पडद्याच्या आकाराप्रमाणे मजकूर आपोआप बदलतो आणि सुलभतेने वाचता येतो. आंतजालाला जोडलेल्या संगणकाच्या, स्मार्टफोनच्या सहाय्याने हे पुस्तक डाउनलोड करता येते आणि मग तत्सम पडद्यावर वाचता येते. कधीकधी एखाद्या संकेतस्थळाने ते उतरवून घेतलेले असते, आणि तिथूनही ते वाचता येते.[२]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Suarez, Michael F (2010). The Oxford companion to the book (English भाषेत). Oxford; New York: Oxford University Press. ISBN 978-0-19-860653-6. OCLC 370356568.
|first2=
missing|last2=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ जोशी, सुहास (२५ फेब्रुवारी २०१६). "ई-पुस्तके गिरवताहेत मराठी कित्ता". लोकसत्ता दैनिक. २१ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.