इरिडियम प्रकल्प
‘इरिडियम सॅटेलाईट’ या कंपनीने अवकाशात पाठविलेले ६६ उपग्रहांनी पृथ्वीभोवती उपग्रहांचे एक जाळे निर्माण केले आहे. १९९८मध्ये सुरू झालेली ही उपग्रह प्रणाली जगभर सॅटेलाईट फोन सेवा पुरवते. संपूर्ण पृथ्वीवर उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत कोठेही ‘इरिडियम फोन सेवा’ पुरविली जाते.
प्रकल्प
[संपादन]सहा अब्ज डॉलर खर्चाच्या या इरिडियम प्रकल्पामध्ये ७७ उपग्रह असतील, अशी सुरुवातीची योजना होती. इरिडियम या मूलद्रव्यातील अणूच्या केंद्राभोवती ज्याप्रमाणे ७७ इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्याप्रमाणे पृथ्वीभोवती ७७ इरिडियम उपग्रह फिरतील, अशी कल्पना प्रकल्पाच्या आयोजकांनी केली होती. पुढे प्रकल्पाची किंमत प्रमाणापेक्षा जास्त वाढू लागल्याने उपग्रहांची संख्या ६६वर मर्यादित ठेवण्यात आली. यांतला ‘इरिडियम ३३’ हा उपग्रह अपघातात नष्ट झाल्याने आता इरिडियम उपग्रहांची संख्या ६५वर आली आहे.
संदर्भ
[संपादन]http://en.wikipedia.org/wiki/Iridium_satellite_constellation